आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Is How Delhi Police Proved The Case Of Damini Gang Rape In Court

...असे सिद्ध झाले \'दामिनी\'च्‍या गुन्‍हेगारांवर लावलेले आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'दामिनी' सामुहिक बलात्‍कारप्रकरणी चार आरोपींना दोषी ठरविण्‍यात आले आहे. सर्व आरोपींविरुद्ध 13 गुन्‍हे दाखल होते. सर्व गुन्‍ह्यांमध्‍ये ते दोषी ठरले आहेत. निकाल जाहीर झाल्‍यानंतर पोलिसांनी समाधान व्‍यक्त केले. परंतु, बलात्‍कार प्रकरणात गुन्‍हा सिद्ध करणे अतिशय अवघड काम असते. दिल्‍ली पोलिसांनी आरोपीविरुद्ध प्रत्‍येक गुन्‍हा न्‍यायालयात सिद्ध करुन दाखवला. घटना घडली त्‍यावेळी पोलिसांवर निष्‍क्रीयतेचे आरोप लावण्‍यात आले होते. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य कळल्‍यानंतर प्रचंड दबाव वाढला. आरोपींना दोषी ठरविण्‍यासाठी पोलिसांनीही प्रचंड परिश्रम घेतले.

पोलिसांनी अतिरिक्त सत्र न्‍यायालयात 3 पुरावे सादर केले. ते आरोपींना दोषी ठरविण्‍यास पुरेसे होते. याशिवाय इतरही अनेक पुरावे सादर करण्‍यात आले. प्रत्‍येक आरोपीचा गुन्‍ह्यात असलेला सहभाग सिद्ध करण्‍यात आला. प्रत्‍येकाबाबत स्‍वतंत्रपणे उल्‍लेख करण्‍यात आला.

पुढील स्‍लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या पोलिसांनी कसा सिद्ध केला प्रत्‍येक गुन्‍हा...