आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीनामे द्यायला हे यूपीए सरकार नाही - राजनाथसिंह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ललित मोदी आणि स्मृती इराणींच्या पदवीविषयक वादावर बुधवारी गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मत व्यक्त केले. कोणताही मंत्री राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट करताना मंत्र्यांनी राजीनामे द्यायला हे काही यूपीए सरकार नाही, अशी टीका त्यांनी केली.

ललित मोदी प्रकरणी वसुंधराराजे, सुषमा स्वराज आणि कथित बनावट पदवीप्रकरणी स्मृती इराणींच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसने केली आहे. त्याला राजनाथांनी प्रत्युत्तर दिले. या मंत्र्यांना राजीनामा देण्याची गरज नाही. हे काँग्रेस सरकार नसून एनडीए सरकार आहे, असे राजनाथसिंह म्हणाले.

ब्रिटनमध्ये ललित मोदींना मदत केल्याप्रकरणी वसुंधराराजेंची स्वाक्षरी असलेली कागदपत्रे समोर आल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. पक्षाचे नेते जयराम रमेश म्हणतात, ‘या प्रकरणाचे गूढ उलगडले आहे. वसुंधरा यांनी आयपीसी, भ्रष्टाचार निर्मूलन अधिनियम, पीएमएलए आणि पासपोर्ट अधिनियम या चार कायद्यांचे उल्लंघन केले आहे. वसुंधरा आणि सुषमा यांना ललित मोदीप्रकरणी राजीनामा मागावा,' असा दबाव काँग्रेसने सत्ताधार्‍यांवर टाकला आहे.

"ट्रान्सपरन्सी'कडून तपासाची मागणी
भ्रष्टाचारविरोधी अभियान चालवणार्‍या ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलद्वारे ललित मोदी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. वसुंधराराजे व सुषमा स्वराज यांनी व्यक्तिगत लाभापायी ललित यांची मदत केल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होते, अशी बाजू ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने मांडली आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने सरकारी विभाग आणि कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांच्या नियुक्तीची प्रक्रिया पारदर्शी करण्याची मागणी केली आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाचे आश्वासन देत भाजप सत्तेवर आले. आता झीरो टॉलरन्सचे तत्त्व पंतप्रधानांनी अमलात आणावे, अशी मागणी होत आहे.
बातम्या आणखी आहेत...