आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Lok Sabha Polls, There Are At Least 450 Voters Named 'Amitabh Bachchan

450 मतदार अमिताभ, 7 हजार गब्बरसिंग; निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर नोंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नावात काय आहे, असे म्हणून नावाला महत्त्व देण्याचे टाळण्याची आपली मानसिकता आहे. मात्र, निवडणुकीतील गमतीजमती पाहता या नावांनाच अधिक महत्त्व असल्याचे दिसून येते. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील नोंदींनुसार देशभरात अमिताभ बच्चन नावाचे 450 मतदार असून त्यांचे वय 20 ते 30 वर्षांचे आहेत. अमिताभच्या जोडीला गब्बरसिंग नाही म्हटल्यावर मजा ती काय? मतदारांच्या नामावलीत चक्क 7 हजार गब्बरसिंगही आहेत. याशिवाय, वीरू, बसंती, जय अशी नावे पाहून ‘शोले’चा प्रभाव अजूनही कायम आहे, हे जाणवत. एवढेच नव्हे, यादीत सुरमा भोपाली आणि मि. इंडिया नावाचेही मतदार आहेत. 45 गब्बरसिंग तर असे आहेत की त्यांच्या पित्याचे नाव एकच म्हणजे हरिसिंग आहे. यादीत मोगँबो मात्र नाही.

16 अँथनी गोन्साल्विस
30 शाहरुख खान
01 हृतिक रोशन
02 सुरमा भोपाली
5000 रोबोट