आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Year Good Rain In Country Skymate Prediction

दिलासा: देशात यंदा सरासरीच्‍या 106 टक्‍के पावसाचा अंदाज, IMD ची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दुष्‍काळग्रस्‍त मराठवाडा, विदर्भासह महाराष्‍ट्राला ही दिलासा देणारी बातमी आहे. देशात यंदा सरासरीच्‍या 106 टक्‍के पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. आयएमडीने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली.
हवामान विभागाची माहिती..
- मागील तीन वर्षांपासून दुष्‍काळजन्‍य परिस्‍थीतीचा सामना करत असलेल्‍या महाराष्‍ट्राला यंदा पाऊस दिलासा देईल.
- यंदा पाऊसमान सरासरीच्या 106 % असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.
- विदर्भ व मराठवाड्यातही चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- खाजगी हवामान संस्था स्कायमेटनेही काल देशभरात चांगल्‍या पावसाचा अंदाज वर्तवला.
- स्कायमेट व भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्‍या अंदाजात साम्‍य आहे.

- स्कायमेटच्या अंदाजानुसार..
जूनमध्‍ये - सरासरीच्या 90 टक्के पाऊस
जुलैमध्‍ये - सरासरीच्‍या 105 टक्के पाऊस
ऑगस्टमध्‍ये - सरासरीच्‍या 108 टक्के पाऊस
सप्टेंबरमध्ये -सरासरीच्या 115 टक्के पाऊस
स्कायमेट संस्थेचा यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा दावा
हवामान अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट संस्थेने यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा दावा केला आहे. केंद्र सरकारनेही गतवर्षीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवली आहे. सोमवारी झालेल्या या दोन्ही दाव्यांमागे एकच कारण आहे - दुष्काळाला कारणीभूत असलेला अल निनो फॅक्टर संपुष्टात येणे. नासा व ऑस्ट्रेलियन संस्थेनेही अल निनो फॅक्टर संपल्याला दुजाेरा दिला.

स्कायमेटनुसार, यंदा १०५ ते ११०%पर्यंत पाऊस पडू शकतो. सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता ३५% आहे. मध्य भारत व पश्चिम किनारपट्टी भागात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. तामिळनाडू, उत्तर-पूर्व भारत व दक्षिण कर्नाटकात काही भागांत पाऊस होईल. दरम्यान, केंद्रीय कृषी सचिव शोभना पटनायक म्हणाले, मेअखेरपर्यंत मान्सून केरळात येताच हा फॅक्टर कमजोर होईल. नंतर वेळेवर व चांगला पाऊस होईल.

अल निनोचा होता अडसर
गेल्या २ वर्षांत अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान घटले होते. यंदा मात्र हा प्रभाव कमी होत असून ला निनाचा प्रभाव वाढत जाणार आहे. ही स्थितीच चांगल्या पावसाला पूरक ठरू शकते, असे पटनायक म्हणाले.

पुढे वाचा.. राज्यांनी सज्ज राहावे, अल निनो म्हणजे? महाराष्ट्रातील दुष्काळावर काय म्हणाले शंकराचार्य.....