आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्‍काळाची छाया : महाराष्ट्र वगळता यंदा देशात चांगले पीकपाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागांना सोडून अख्या देशभरावर वरुणराजा मेहेरबान आहे. देशात तांदूळ, कडधान्ये आणि तेलबियांचे चांगल्या उत्पादनाची चिन्हे आहेत. हवामान खात्याचे महासंचालक लक्ष्मणसिंह राठोड यांनी सांगितले की, यंदा खरीपाच्या हंगामात ५० टक्क्यांपेक्षा जास्त पेरण्या झाल्या आहेत. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात २४ जुलैपर्यंत ६९३ लाख हेक्टरमध्ये पेरण्या झालेल्या आहेत. शेतक-यांनी यंदा कडधान्ये, तेलबिया आणि भरड धान्याची जोरदार पेरणी केली आहे.

देशात पाऊस :
*देशात आतापर्यंत सरासरीपेक्षा चारच टक्के कमी पाऊस पडला आहे.
*जुलैमध्ये पाऊस सरासरीपेक्षा १७ टक्के कमी पडला आहे.

मराठवाड्याचे चित्र तुलनेत भीषण
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, आंध्र प्रदेशातील रायलसीमा, तेलंगणचे काही जिल्हे आाणि उत्तर कर्नाटकातील अंतर्गत भागात परिस्थिती भीषण आहे. तसेच बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातील काही भाग सोडून उर्वरित उत्तर भारतात चांगला पाऊस झाल्याने पीकांची परिस्थिती चांगली आहे.