नवी दिल्ली- या वर्षी पाऊस चांगला झाल्याने धान्याचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. कृषी सचिव शोभना पटनायक यांनी रविवारी विशेष मुलाखतीत ही माहिती दिली. गेल्या वर्षी धान्य उत्पादन १३.८ कोटी टन एवढे झाले होते. पटनायक म्हणाल्या की, खरिपाची ८०% पेक्षा जास्त पेरणी झाली आहे. त्यात धान, डाळी, तीळ, कापूस, ऊस आणि ज्यूट या पिकांचा समावेश आहे. काही भागांत पुढील महिन्यापर्यंत पेरणी सुरू राहील.
अनेक राज्यांत पूर आल्याबद्दल चिंता व्यक्त करून पटनायक म्हणाल्या की, पुरामुळे १९ लाख हेक्टरमधील पिकांना फटका बसला आहे. तेथील पेरणी झालेली पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतातील पाणी कमी झाले की शेतकरी तेथे दुसरे पीक घेतील. अर्ध्या कर्नाटकमध्ये दुष्काळसदृश स्थिती हा चिंतेचा विषय आहे. असे असले तरी खरीप पिकांची पेरणी मागील वर्षापेक्षा ३% जास्त आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यापर्यंत ८७८.२३ लाख हेक्टरमध्ये पेरणी झाली होती. एक वर्षापूर्वी हा आकडा ८५५.८५ लाख हेक्टर होता. पटनायक यांनी सांगितले की, तेलबियांची पेरणी कमी झाली आहे, पण हा चिंतेचा मुद्दा नाही. अजूनही हाती काही वेळ आहे. डाळींमध्येही तुरीची डाळ वगळता इतर डाळींचा पेरा वाढला आहे.
गेल्या वर्षी झाले होते १३.८ कोटी टन धान्योत्पादन
२०१६-१७ च्या खरीप हंगामात विक्रमी १३.८ कोटी टन धान्योत्पादन झाले होते. त्याआधी २०१३-१४ मध्ये १२.८६ कोटी टनांचा विक्रम झाला होता. गेल्या वर्षी धानाचे उत्पादन ९.६० कोटी टन, डाळींचे ९१.२ लाख टन, धान्य ३.२ कोटी टन, तेलबियांचे २.२८ कोटी टन आणि कापसाच्या ३.०५ कोटी गाठी असे उत्पादन झाले होते, अशी माहितीही देण्यात आली.
पीक - गेल्या वर्षीची पेरणी - या वर्षीची पेरणी
धान - २८०.०३ - २६६.९३
डाळी - १२१.२८ - ११६.९५
तेलबिया - १४८.८८ - १६५.४९
पूस - ११४.३४ - ९६.४८
ऊस - ४९.७१ - ४५.६४
(आकडे लाख हेक्टरमध्ये)