आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींसाठी खास आहे ही अॅक्ट्रेस, गुजरात इलेक्शनमध्ये करतेय काँग्रेसची मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधींनी दिव्य स्पंदन यांना सोशल मीडिया कॅम्पेनची जबाबदारी दिली आहे. - Divya Marathi
राहुल गांधींनी दिव्य स्पंदन यांना सोशल मीडिया कॅम्पेनची जबाबदारी दिली आहे.
नवी दिल्ली - मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या सोशल मीडियाची रणनीती बदललेली आणि आक्रमक झाल्याचे दिसतेय. याचे श्रेय साऊथ अॅक्ट्रेस दिव्य स्पंदनला दिले जात आहे. राहुल गांधींनी त्यांना नुकतीच काँग्रेसच्या सोशल मीडियाची जबाबदारी दिली आहे.
 
गुजरातमध्ये दिसतोय रणनीतीची इफेक्ट...
- असे मानले जाते की, "विकास पागल हो गया है" या वाक्प्रचाराला व्हायरल करण्याचे काम 34 वर्षीय दिव्य स्पंदनच्या नेतृत्वातील सोशल मीडिया टीमने केले आहे. याचा काँग्रेसला गुजरात निवडणूक प्रचारात खूप फायदा मिळत आहे आणि त्या अॅग्रेसिव्ह होऊन काम करत आहे. राहुल यांनी जीएसटीवर केलेल्या भाषणांना नव्याने समोर आणण्याचा त्या प्रयत्न करत आहे. यामुळे राहुल यांची इमेज सुधारण्यास मदत मिळतेय.
 
जिंकलेली आहे लोकसभा निवडणूक...
- आईच्या काँग्रेसशी असलेल्या जवळिकीमुळे दिव्य 2012 मध्ये काँग्रेसमध्ये सामील झाल्या होत्या. 2013 मध्ये कर्नाटकच्या मंड्या मतदारसंघात झालेली लोकसभा पोटनिवडणूक जिंकून खासदार बनल्या. तथापि, वर्ष 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. याआधी तरुण खासदार म्हणून त्या पाकिस्तानात गेल्या होत्या आणि तेथे त्यांनी केलेल्या (पाकिस्तान चांगला आहे, नरक नाही) यामुळे मोठा वाद झाला होता.
 
सावत्र वडिलांसह राहिल्या दिव्य
- दिव्य स्पंदन यांच्या आई सिंगल पॅरेंट आहेत. त्या ऊटीच्या बोर्डिंग शाळेत शिकल्या. जोपर्यंत दिव्य आठव्या इयत्तेत होत्या, तोपर्यंत त्या सावत्र वडिलांसह त्यांच्या घरी राहिल्या. त्यांनीच दिव्य यांच्या शिक्षणाचा भार उचलला. ग्रॅज्युएशन पूर्ण होताच त्यांना चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. आणि त्यांनी काही चित्रपटांतही नाव कमावले.
 
या चित्रपटांत केले काम...
- दिव्य पहिल्यांदा 2004 मध्ये तामिळ फिल्म इंडस्ट्रीत आल्या. त्यांनी रम्या नावाने "कुथ्थू" चित्रपटात काम केले. यामुळे त्या "रम्या" नावाने प्रसिद्ध झाल्या. यानंतर 2006 मध्ये "तनानाम तनानाम" चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर त्यांचे अनेक चित्रपट आले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, दिव्य स्पंदन यांचे निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...