नवी दिल्ली - थॉमसन रॉयटर्स या संस्थेने २००२ मध्ये संभाव्य नोबेल विजेत्यांबाबत वर्तवलेले भाकीत योग्य ठरले होते. २०१३ मध्ये त्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजामध्ये ३५ जणांना नोबेल मिळाला आहे. मात्र, २०१४ मध्ये राममूर्ती रमेश यांना मिळालेल्या भौतिकशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा त्यांचा अंदाज हुकला आहे. यामध्ये नऊ जणांना त्याच वर्षी तर १६ जणांना पुढे सन्मान मिळाला. २००४ व २००६ या दोन वर्षी जाहीर केलेल्या एकाही व्यक्तीला नोबेल मिळाला नव्हता. २०११ मध्ये विज्ञान श्रेणीमध्ये त्यांनी जाहीर केलेल्या सर्व नऊ शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार मिळाला होता.