आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IAF चे बेपत्ता विमान AN-32 मधील 29 जण डेड घोषित, पुण्यातील लेफ्टनंटचा होता समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाचे (IAF) बेपत्ता मालवाहू विमान AN-32 मधील सर्व प्रवाशांना मृत घोषित करण्यात आले आहे. या विमानात प्रवास करणाऱ्यांच्या नातेवाईकांना सांगण्यात आले आहे की त्यांचे प्रियजन घरी येण्याची शक्यता मावळली आहे. यापुढे त्यांना मृत समजावे. AN-32 मध्ये 29 जण प्रवास करत होते. या विमानात पुण्यातील निगडी येथील फ्लाइट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे (28) या अधिकाऱ्याचा समावेश होता.

चेन्नई येथील विमानतळावरून 22 जुलै रोजी सकाळी ‘अंतोनोव्ह 32’ या विमानाने पोर्टब्लेअरला जाण्यासाठी उड्डाण केले. बंगालच्या उपसागरावरून जात असतानाच टेकअाॅफनंतर 16 मिनिटांतच विमानाचा संपर्क तुटला. युद्धपातळीवर प्रयत्न केले असले तरी या विमानाचा ठावठिकाणा लागला नसल्याने यातील प्रवाशांना मृत घोषित करण्यात आले आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोण होते कुणाल बारपट्टे
बातम्या आणखी आहेत...