आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वीपर्यंत शिकलेल्यांना 9% वेतनवाढ, मात्र पदवीधरांच्या वेतनात 37% पेक्षा जास्त कपात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गेल्या तीन वर्षांत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात बदल झाल्याचे दिसत आहे. यात आश्चर्याची बाब म्हणजे २०१४ ते २०१६ दरम्यान माध्यमिक व पदव्युत्तर पदवीधारकांच्या(पीजी) वेतनात घसरण झाली आहे. ऑनलाइन जॉब पोर्टल मॉन्स्टरच्या वेतन निर्देशांकात ही बाब समोर आली आहे. त्यानुसार माध्यमिक शिक्षण झालेल्यांच्या वेतनात ९% तर पीजी झालेल्यांचे वेतन ३७% पेक्षा जास्त घटले आहे. 
 
मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नोकरीचे चित्र फार सुखावह नाही. या क्षेत्रातील वेतनात सर्वात जास्त १६% पर्यंत घसरण नोंदली आहे. याशिवाय वाहतूक व दूरसंचार क्षेत्रातही सरासरी वेतन घटले आहे. सर्वात जास्त ४० % वाढ वित्तीय सेवा, बँकिंग व विमा क्षेत्रात झाली आहे. वेतन निर्देशांकात विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्तींचे शिक्षण व त्यांना मिळणारा ताशी मोबदला विचारात घेण्यात आला आहे. यामध्ये गेल्या ३ वर्षांत सर्वात जास्त वाढ १२ वीपर्यंत शिकणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात झाली आहे. असे असले तरी ते पीजीपेक्षा १६१% कमी आहे. अहवालात आठ मुख्य क्षेत्रांचा समावेश आहे.  
 
शिक्षणात मिळतात ताशी २४२ रुपये
निर्देशांकानुसार, दर ताशी मिळणाऱ्या वेतनात वित्त, बँकिंग व विम्याशिवाय आयटी व बांधकाम क्षेत्र सर्वात आघाडीवर आहेत. सर्वात कमी वेतनाच्या क्षेत्रात मॅन्युफॅक्चरिंगनंतर शिक्षण व संशोधन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिथे ताशी सरासरी २४२ रुपये मिळतात. 
बातम्या आणखी आहेत...