आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Threat By ISIS To 5 States Including Maharashtra

भारतात ISIS चा धोका, महाराष्ट्रासह 5 राज्ये निशाण्यावर, अलर्ट जारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पाठोपाठ आता भारतावरही ISIS या दहशतवादी संघटनेचा धोका असल्याची माहिती मिळाली आहे. सरकारने मंगळवारी एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. त्यात सर्व राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार काही विशिष्ट ठिकाणांनाही लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. देशातील पाच राज्यांना अधिक सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांचा त्यात समावेश आहे.

गृह मंत्रालयाने जारी केली अॅडव्हायजरी
गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अॅडव्हायजरीमध्ये कबूल केले आहे की, ISIS चा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सिरिया आणि इराकमधून ही दहशतवादी संघटना इतर देशांमध्येही पाय पसरत आहे. भारतात प्रामुख्याने वरील पाच राज्ये या संघटनेच्या निशाण्यावर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यातील शहरांची नावे अद्याप सांगण्यात आलेली नाहीत. अॅडव्हायजरीनुसार अधिक चिंतेची बाब म्हणजे ISIS देशातील तरुणांना दहशतवादाकडे आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहे.

भारतातील दहशतवादी संघटनांची मदत घेण्याचा प्रयत्न
सुत्रांच्या माहितीनुसार ISIS भारतात हल्ले घडवण्यासाठी देशात सक्रिय असलेल्या काही दहशतवादी गटांची मदत घेण्याच्या प्रयत्नात आहे. सरकारने फ्रान्स, रशिया, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, तुर्कस्तान आणि इस्रायलच्या दुतावासांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीगी ISIS हा एक मोठा धोका असून सरकारला त्याचा निपटारा करावा लागणार असल्याचे मान्य केले आहे. ते मंगळवारी म्हणाले, भारतच नव्हे तर संपूर्ण देशाला या दहशतवादी संघटनेपासून धोका आहे. सर्वांना एकत्रितपणे या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी, ISIS विषयी आस्था किंवा सहानूभुती असलणाऱ्यांवर करडी नजर ठेवावी लागणार आहे.