आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जजला याकूबच्या फाशीवरून धमकी, राच्या मागच्या दारात मिळाले पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट मालिकेतील दोषी याकूब मेमनच्या फाशीविरोधातील अंतिम आव्हान याचिका फेटाळणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील तीन न्यायमूर्तींपैकी एक दीप मिश्रा यांना ठार मारण्याची धमकी आली आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी मिश्रा यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.न्यायमूर्ती मिश्रांच्या घराच्या मागच्या दारात पत्र मिळाले. ‘आम्ही तुम्हाला सोडणार नाही,’ असे खाकी रंगाच्या लिफाफ्यात लाल पेनने लिहिले आहे. पत्रात कोणाच्याही नावाचा उल्लेख नाही.

टायगरचा आईला फोन ?
याकूबच्या फाशीपूर्वी कटाचा सूत्रधार व त्याचा भाऊ टायगर मेमन फोनवरून आईशी बोलल्याच्या वृत्ताचे मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी खंडन केले. याची माहिती मिळाली नसल्याचे गृह अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...