नवी दिल्ली - २१ स्मार्टफाेन कंपन्यांना केंद्राने नाेटिस बजावून ‘तुमच्या फाेनमधील डाटा किती सुरक्षित अाहे, त्यासाठी काय उपाय केले’ अशी विचारणा केली. २८ अाॅगस्टपर्यंत ही माहिती द्यायची अाहे. ६ महिन्यांच्या तपासानंतर केंद्राने हे पाऊल उचलले. या कंपन्यांत अॅपल, सॅमसंग, मायक्राेमॅक्स, व्हिवाे, अाेप्पाे, शाअाेमी व जियाेनी अादींचा समावेश असून बहुतांश कंपन्या चीनमधील अाहेत. दोषी कंपन्यांना दंड ठाेठावला जाईल. देश-विदेशात स्मार्टफाेनमधून डाटा चाेरीस जात असल्याच्या घटनांमुळे हे पाऊल उचलले अाहे.
या चार गाेष्टींची हाेते चाेरी
1) काॅन्टॅक्ट लिस्ट
हा डाटा जाहिरात कंपन्या, टेलिकाॅलर्स आदींना विक्री केला जातो. ब्लॅकमेलिंगसाठीही गैरवापर हाेऊ शकताे.
2) लोकेशन : सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत घातक. गुन्हेगारांना ही माहिती मिळाली तर अपहरण व इतर गंभीर गुन्ह्यांचे प्रकार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
3) मेसेज : व्हाॅट्सअॅप व मेसेजिंग अॅप यूजरची माहिती गाेळा करते. त्याचा हॅकरकडून गैरवापर केला जाऊ शकताे.
4) फोटो : तुमचे खासगी फाेटाेंचा दुरुपयाेग केला जाऊ शकताे. अशा प्रकारांतून ब्लॅकमेलिंगही हाेण्याची भीती आहे.