आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Threatening Call Of Prime Minister, Before Sonia Gandhi Also Experienced

पंतप्रधानांच्या नावाने धमकीचा कॉल, यापूर्वी सोनिया गांधींच्या नावे बोगस कॉलचा प्रयोग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सोनिया गांधी यांच्या नावाने बोगस कॉल करण्याचे प्रकरण ताजे असतानाच पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नावे धमकी देण्याचा आणखी प्रकार समोर आला आहे. टी सिरीज या म्युझिक कंपनीने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.


कंपनीच्या अधिका-यांना मनमोहनसिंग यांच्या नावाने फोन आला. आवाज हुबेहूब त्यांच्यासारखाच होता. फोन करणारी व्यक्ती एका कर्मचा-याची बाजू घेऊन बोलत होती. त्याने कंपनीचे मालक आणि वरिष्ठ अधिका-यांना धमकावले. कंपनी बंद करण्याचीही धमकी दिली. तक्रारीनुसार शत्रुघ्न सिन्हा आणि लालूप्रसाद यादव यांच्याही नावाने असे फोन आले होते. कंपनीतील कर्मचारी किशनकुमार याच्यावर कंपनीच्या अधिका-यांनी संशय व्यक्त केला आहे, असे पोलिसांनी सांगितले. तो पंतप्रधानांचा आवाज हुबेहूब काढतो. कंपनीने त्याला 30 जून रोजी बडतर्फ केले होते. यापूर्वी अ‍ॅटर्नी जनरल गुलाम वहानवटी यांना सोनिया गांधींच्या नावाने बोगस कॉल आला होता. कॉल करणा-या महिलेने वहानवटी यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता. या प्रकरणाचीही पोलिस चौकशी करीत आहेत.