आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-कश्मीरमध्ये तीन तासांत तीन दहशतवादी हल्ले, तीन पोलिसांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो:जखमी पोलिस कॉन्स्टेबलला रुग्णलयात देताना सहकारी)
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी (5 एप्रिल) दहशतवाद्यांनी पोलिसांना टार्गेट केले. दहशतवाद्यांनी तीन तासांत तीन हल्ले केले. दहशतवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात तीन पोलिसांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले.
उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला शहरात दहशतवाद्यांनी पहिला हल्ला केला. एका धावत्या बसमध्ये पोलिस सब इंस्पेक्टरवर गोळी झाडून दहशतवादी फरार झाले. ही बस श्रीनगरहून सोपोर येथे जात होते. सब इंस्पेक्टर गुलाम मुस्तफावर गोळ्या झाडल्या. सोपोरजवळ बस थांबवून दोन्ही दहशतवादी फरार झाले. गुलाम मुस्तफा यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दुसरा हल्ला शोपिया जिल्ह्यात झाला. दहशतवाद्यांनी तीन पोलिसांवर अंदाधुद गोळीबार केला. हल्ला झाला तेव्हा तिन्ही पोलिस पेट्रोलिंग ड्यूटीवर होते. तसेच तिसरा हल्ला त्रालमध्ये झाला. त्रालमध्ये दहशतवाद्यांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी राज्यातील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली आहे. या दहशतवादी हल्ल्यातून आम्हाला काश्मीरमधील सद्यस्थितीतील आव्हानांची आठवण होते, आम्ही विविधरंगी वसंत साजरा करत आणि दुसरीकडे आमचे पोलिस मारले जात आहे. शोपियामध्ये वीरमरण आलेल्या तीन पोलिसांच्या दु:खात सहभागी आहे, असे असे अब्दुल्लांनी ट्‍वीट केले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...