नवी दिल्ली- अपेक्षेनुरूप मीरा कुमार यांचा पराभव करत रामनाथ कोविंद भारताचे राष्ट्रपती बनले. कोविंद यांनी लाख ३४ हजार मतांनी विजय मिळवला. या फरकाने काँग्रेसची चिंता वाढवली आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाली. किमान १० राज्यांत मीरा कुमार यांना त्यांच्या काँग्रेस पक्षाकडून पूर्ण मते मिळाली नाहीत. या क्रॉस व्होटिंगचे अनेक राजकीय पैलू आहेत. विशेषकरून गुजरातमध्ये. कारण, याच वर्षी येथे राज्यसभेच्या तीन जागांसाठी विधानसभेची निवडणूक होणार आहे. कोविंद यांना ११६ आमदारांचे क्रॉस व्होट मिळाले, असा दावा भाजपचे महासचिव भूपेंद्र यादव यांनी केला आहे. सर्वाधिक काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केली.
गुजरात, गोवा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, त्रिपुरा दिल्लीत कोविंद यांना अपेक्षेपेक्षाही अधिक मते पडली. गुजरातमध्ये शंकरसिंह वाघेला यांच्या समर्थक आमदारांनी मीरा कुमार यांच्याऐवजी कोविंद यांना मत दिले. गुजरातमध्ये कोविंद यांना १३२ आणि मीरा कुमार यांना ४९ मते पडली आहेत. राज्यात काँग्रेसचे ५७ आमदार आहेत. दिल्लीत भाजपचे चार आमदार आहेत पण कोविंद यांना सहा मते पडली. हे दोन मत आम आदमी पक्षाच्या दोन आमदारांचे आहेत. पश्चिम बंगालमध्ये कोविंद यांना ११ आणि मीरा कुमार यांना २७१ मते पडली. येथे भाजप आणि घटक पक्षांचे मत आहेत. त्रिपुरात आघाडी नसतानाही कोविंद यांना मते पडली. ही मते टीएमसीच्या बंडखोर आमदारांचे असावेत, असे मानले जाते. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे १८५ आमदार आहेत. तरीसुद्धा कोविंद यांना २०८ मते पडली. गोव्यातही त्यांना अपेक्षेपेक्षा पाच जास्त मते पडली. गोव्यात काँग्रेसचे ११ आमदार आहेत, पण मीरा कुमार यांना ११ मतेच पडली. आसाममध्ये भाजपचे ८७ आमदार असूनही कोविंद यांना ९१ मते पडली, तर उत्तर प्रदेशात मीरा कुमार यांना ७४ मते पडायला हवी होती, पण त्यांना ६५ मतेच मिळाली.
राजस्थान: १० भाजप आमदारांनी काँग्रेसच्या मीरा कुमार यांना मत दिले. त्यांना राजस्थान, हिमाचल, सिक्कीम नागालँडमध्ये क्रॉस व्होट मिळाले. राजस्थानात काँग्रेसचे २१, बसप आमदार आहेत, पण कुमार यांना ३४ मते पडली.
पुढील स्लाइडवर वाचा... परोखमधून ग्राऊंड रिपोर्ट आणि तीन किश्श्यांतून जाणून घ्या देशाच्या राष्ट्रपतींचे व्यक्तिमत्त्व
हेही वाचा...