आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वडिलांनी रात्रभर केली शरण येण्याची विनंती, पहाटे मारला गेला दहशतवादी मुलगा !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - सुरक्षाजवानांनी सोमवारी रात्री पुलवामाच्या हजानमध्ये जैश-ए-मोहंमदच्या तीन दहशतवाद्यांना जिवंत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांना शस्त्र टाकण्याचे आवाहन करण्यात आले. एक दहशतवादी शौकतच्या वडिलांना बोलावण्यात आले. त्यांनी मुलाला शरण येण्यास सांगितले, मात्र त्याने नकार दिला. अखेर 18 तासांच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
अल्ताफ अहमद राथर, फारुक अहमद तसेच शौकत अहमद अशी अतिरेक्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एसएलआर रायफल्स जप्त करण्यात आल्या. ज्या घरात त्यांनी आसरा घेतला होता, त्या परिसरात दाट वस्ती होती. सुरक्षा जवानांनी रात्री दहशतवादी शौकतच्या वडिलांना घटनास्थळी बोलावले होते. त्यांनी मुलास शरण येण्यास सांगितले. शस्त्र खाली टाकणार असेल तर प्राण वाचू शकतात, अशी हमी जवानांनी त्याला दिली. वडील रात्रभर विनवणी करत राहिले, मात्र त्याला त्याने प्रतिसाद दिला नाही. यानंतर सकाळच्या चकमकीत तीन दहसतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

जैशचा कमांडर असलेल्या अल्ताफने मुलाला भडकवले होते, असे दहशतवाद्याच्या म्हणजे शौकत्या वडिलांनी सांगितले. त्याआधी पोलिसांना दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळताच सीआरपीएफच्या जवानांनी पूर्ण गावाला घेराव घातला होता.

पुढील स्लाइडवर पाहा, दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीची छायाचित्रे...