आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मोदी फॉर पीएम’साठी नरेंद्रसिंह तोमर, रमणसिंह, वसुंधराराजेंवर जबाबदारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपचे ‘मिशन 272 प्लस’ साकारण्यासाठी पक्षाध्यक्ष राजनाथसिंह व नरेंद्र मोदी यांनी तीन महारथींची निवड केली आहे. लोकसभा निवडणुका पार पडेपर्यंत या तिघांना ‘मोदी फॉर पीएमसाठी’ घाम गाळावा लागणार आहे. मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्ष नरेंद्रसिंह तोमर, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
लोकसभा निवडणूक पार पडेपर्यंत प्राधान्यक्रमाच्या आधारे हे तिघे ‘मोदी फॉर पीएम’ मोहिमेअंतर्गत होणा-या कामांवर निगराणी ठेवून आवश्यक निर्देश देणार असल्याचे सादरणीकरणानंतर मोदी व राजनाथ यांनी सांगितले. संस्थात्मक पातळीवर कुठे गफलत होत आहे, याचा आढावा तोमर हे घेतील. पिछाडीवर पडल्यानंतर त्याच्या भरपाइचे उपाय व त्यांची अंमलबजावणी कशी करायची, याचे मार्गदर्शन रमणसिंह देतील. सोशल नेटवर्किंग वेबसाइट्सच्या माध्यमातून एकेक मतदाराला भाजपची कसे जोडले जाऊ शकते, याची माहिती वसुंधरा राजे देतील.
दिग्गजांच्या भूमिका अशा
1. भाजपच्या केंद्रीय निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकीत नरेंद्र तोमर यांनी मध्य प्रदेशातील भाजपच्या विजयात संस्थात्मक बाबींवर मुद्देसूद सादरीकरण केले.
2. रमणसिंह यांनी पराभवाला विजयात कसे रूपांतरित करायचे, या विषयावर आपले सादरीकरण दिले. छत्तीसगड निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पिछाडीवर असूनही दुस-या टप्प्यातून केलेल्या भरपाईची माहिती दिली.
3. वसुंधराराजे शिंदे यांनी फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.