आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ठुल्ला' म्हणणाऱ्या केजरींविरोधात पोलिस कॉन्स्टेबलची तक्रार, DCPने साधला निशाणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांना 'ठुल्ला' संबोधणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात तीन कॉन्स्टेबलनी तक्रार दाखल केली आहे. केजरीवालांविरोधात दिल्ली पोलिसचे हेड कॉन्स्टेबल हरविंदर यांनी दक्षिण दिल्लीतील गोविंदपुरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. दिल्ली उत्तरचे डीसीपी मधुर वर्मा यांनी ट्विट करुन केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी एका फोटोसह केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की "ठुल्ला संबोधल्या जाणाऱ्या पैकी एकाने चार वर्षांची मुलगी खुशबूचे प्राण वाचवले आणि तिला सुरक्षित तिच्या आईच्या ताब्यात दिले."
मुले विचारत आहे, 'ठुल्ला' कोणाला म्हणतात
लाजपत नगर येथील पोलिस कॉन्स्टेबल अजय कुमार तनेजा यांनी देखील केजरीवालांविरोधात अब्रुनुकसानीची तक्रार दाखल केली आहे. त्यांचे म्हणणे आहे, की जेव्हा मुख्यमंत्र्यांची मुलाखत सुरु होती, तेव्हा ते त्यांच्या मुलांसोबत बसलेले होते. ज्या वेळी केजरीवाल यांनी त्या शब्दाचा वापर केला तेव्हा त्यांच्या 12 वर्षांच्या मुलाने विचारले, 'ठुल्ला कोणाला म्हणतात?' तक्रारदार पोलिस कॉन्स्टेबलचे म्हणणे आहे, की मुख्यमंत्र्यांनी वापरलेल्या भाषेमुळे आमचा अवमान झाला आहे. एका कॉन्स्टेबलने पोलिस आयुक्त बस्सी यांच्याकडे तक्रार केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे पोलिसांचे मनोबल तुटले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...