आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Storey Building Fell Half Dozen People Suspected Of Being Caught At Delhi

दिल्लीत तीन मजली इमारत कोसळली; बचावकार्य सुरु, अनेक लोक अडकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीतील गौतमपुरा भागातील एक तीन मजली इमारत आज (बुधवारी) पहाटे कोसळली. ढिगार्‍याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहे. ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे.

या दुर्घटनेत दोन कुटूंबातील काही लोक अटकल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, अद्याप किती लोक बेपत्ता आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु झाले आहे.