आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली पोलिसांच्या उपनिरिक्षकाने भरधाव कार चालवत 3 महिला मजूरांना चिरडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बदरपूर परिसरात दिल्ली पोलिसांच्या उपनिरिक्षकाने भरधाव कार चालवत तीन महिला मजुंराना चिरडले. या अपघातात तिनही मजुरांचा मृत्यू झाला आहे.
बदरपूर उड्डाणपुलावर हा अपघात झाला. दिल्ली पोलिस मुख्यालयातील उपनिरिक्षक एस. आय वीरपाल नाईट ड्युटी करुन घरी जात होते. यावेळी उड्डाणपुलावर महिला मजूर साफसफाईचे काम करीत होत्या. वीरपाल भरधाव कार चालवत होते. त्यांनी तिनही महिलांना जोरदार धडक दिली. घटनेनंतर वीरपाल यांना अटक करण्यात आली.
सिव्हिल ड्रेसमध्ये होते वीरपाल
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, की उड्डाणपुलावर एकूण 6 महिला मजूर काम करीत होते. यावेळी एक गाडी भरधाव आली. तीन महिलांना चिरडत गेली. जरा वेळाने पुढे थांबली. त्यानंतर गार्डने चालकाला धरून ठेवले. पोलिसांना फोन केला. यावेळी चालक म्हणाला, की मी पोलिस अधिकारी आहे. झोप येत होती. त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले.
रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिनही महिलांचा मृत्यू झाला होता.
सोमवारी दिल्ली पोलिस हवालदाराने महिलेच्या पाठीत मारली होती वीट
सोमवारी दिल्लीत घडलेल्या खळबळजनक घटनेने देशाचे लक्ष वेधून घेतले. एका महिलेसोबत झालेल्या भांडणानंतर वाहतूक पोलिसांच्या हवालदाराने चक्क वीट फेकून मारली. हवालदार महिलेच्या पाठीवर वीट फेकून मारतोय, याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग चांगलेच व्हायरल झाले होते.