आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारमधून डोकावत होती 3 वर्षांची चिमुकली, कापली गेली मान, दिल्‍लीतील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कारमधून डोकावत असलेल्‍या तीन वर्षांच्‍या मुलीची पंतगाच्‍या चाइनीज मांज्यामुळे मान कापली गेली. यात तिचा जागीच मृत्‍यू झाला. ही घटना राणी बाग परिसरात सोमवारी सायंकाळी घडली. सांची गोयल असे त्‍या दुर्दैवी मुलीचे नाव आहे.

होती एकुलती एक मुलगी
> तीन वर्षांची सांची आपल्‍या आई - वडिलांसह नारायणा येथून चित्रपट पाहून घरी परतत होती.
> दीपाली चौकाजवळ ती कारमधून बाहेर डोकावत होती. अचानक एका चाइनीज मांज्‍यामध्‍ये तिची मान अडकून कापली गेली.
> टिंबर मर्चेंट असलेले तिचे वडील आलोककुमार गोयल तिला तत्‍काळ भगवान महावीर रुग्‍णालयात घेऊन गेले.
> मात्र, तोपर्यंत तिचा मृत्‍यू झाला होता.
> सांची आपल्‍या आई वडिलांना एकुलती एक मुलगी होती.
चाइनीज मांज्यावर बंदी
पर्यावरण विभागाने दिल्ली-एनसीआरमध्‍ये चाइनीज मांज्‍यावर बंदी घातली आहे. एवढेच नाही तर नायलॉन, प्लास्टिक आणि काचेचा वापर केलेल्‍या धाग्‍यावरसुद्धा बंदी आहे. असे असतानाही सर्रासपणे हे धागे वापरले जात आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...