आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलेतून खवय्यांसाठी चटपटीत पदार्थांच्या गोष्टी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - खवय्यांसाठी ही बातमी आहे. पाककृती कलेच्या माध्यमातून प्रत्यक्षात समजून घेण्याची कल्पना सध्या राजधानीत प्रत्यक्षात आली आहे. द्रवरूपातील पदार्थ एकमेकांशी जोडण्यात आलेल्या पाईपातून पोहोचवला जात आहे. वॉटर रेसिपीज त्यातून पाहायला मिळू लागल्या आहेत.


वॉटर रेसिपीजच्या माध्यमातून खाद्य गोष्टी सांगणारे हे सात कलाकार आहेत. त्यांनी परफॉर्मिंग आर्ट आणि इंटरॅक्टिव्ह इन्स्टॉलेशनच्या मदतीने हे शक्य करून दाखवले आहे. ‘इन कॉन्टेक्स्ट : पब्लिक. आर्ट. इकॉलॉजी : फूड एडिशन’ या नावाने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. आपण काय खातो, त्यावरच आपण काय आहोत हे ठरते. म्हणूनच त्यामागे संस्कृती, पर्यावरण, सामाजिक संदर्भ असतो, असे अस्मिता रंगारी यांनी सांगितले. खाद्यविषयक सत्त्वाची माहिती देणारे प्रात्यक्षिक कलाकार आगत शर्मा आणि अंबिका जोशी यांनी तयार केले. त्यात शॉपिंग मॉल आणि तेथील खाद्य सवयींचे प्रतिबिंब पाहायला मिळते. काही प्रात्यक्षिकातून पाहणाºयांना जिभेने पदार्थांना चाटण्याची कृती, चावणे, गिळणे अशा गोष्टी अगदी जवळून समजून घेता येतात. लिपिका बंसल (34) यांनी चटपटी स्टोरी सदरात महिलांचा अन्नपदार्थ बनवण्याशी असलेला संबंध दाखवून दिला. खाद्यपदार्थांच्या गोष्टीतून त्यांनी ते मांडले. खिरकी गावातील महिलांचे जीवन त्यातून दाखवण्यात आले. त्यासाठी बंसल यांनी सात खाणी टिफिन बॉक्स वापरला.


शॉपिंग-डायजेशन सारखेच
शॉपिंग कशी करावी, हे शरीराला सांगण्याची गरज नाही. ते आपोआप करू लागते. पचनाचाही विषय अगदी
तसाच आहे. शिकवण्याची गरज नाही. दोन्हीही गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे सरावलेल्या असतात. शरीर याविषयी स्वत: च विचार करत असते. या तत्त्वावरच प्रदर्शनातून भर दिल्याचे 28 वर्षीय कलाकार आगत शर्मा यांनी सांगितले.
कोणाची कल्पना
खोज इंटरनॅशनल आर्टिस्ट्स असोसिएशनच्या वतीने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात जगभरातील सात कलाकार सहभागी झाले आहेत.


तंत्रज्ञान-राजकारणही
खाद्यपदार्थ बनवण्यात कसले आलेय राजकारण ? पण त्याचाही समावेश असतो, असा दावा करणारे सादरीकरण न्यूयॉर्कच्या कॅथरिन मॅकमहनने केले आहे. तंत्रज्ञानाचाही तेवढाच वाटा असतो, असे त्यांनी त्यातून सिद्ध करून दाखवले आहे. जपानच्या 29 वर्षीय अँद्रे वाको आणि मिआ मोरिकावा यांनी पाण्याच्या पुनर्वापर आणि बचतीचे तंत्र आपल्या कला देखाव्यातून सादर केले.