आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आप’ च्या खात्यावर निधी संकलनातून १८ कोटी, संकलनाचे लक्ष्य गाठण्यात अपयश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला एक्झिट पोलकडून कौल देण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय ध्येय गाठणा-या ‘आप’ला निधी संकलनात मात्र लक्ष्य गाठण्यात अपयश आले आहे. ७ फेब्रुवारीपर्यंत पक्षाने ३० कोटींचे ध्येय ठेवले होते. ते पूर्ण करता आले नाही.

पक्षाने ७ फेब्रुवारीच्या अगोदर ३० कोटी रुपये उभारणीचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु प्रत्यक्षात त्यांना १८ कोटी रुपयांपर्यंत मजल मारता आली. त्या अगोदर पक्षाने विविध प्रकारचे उपक्रम राबवले. त्यात डिनर, ‘कॉफी वुइथ केजरीवाल’, ‘सेल्फी वुइथ मफलरमॅन’ इत्यादीचा समावेश होता. पक्षाने मोठा खटाटोप करूनही हाती योग्य ती रक्कम जमवता आली नाही. त्याबद्दल पक्षाने देणगीदारांना दोष दिला नाही. आम्ही जे उद्दिष्ट ठेवले होते. त्यात यश आले नाही. परंतु आमचे प्रयत्न केवळ दोन महिन्यांतील आहेत. त्यात एवढी रक्कम जमा झाली आहे. हा काळ खूप कमी होता, हे विसरता कामा नये, असे निधी संकलनाचे प्रमुख अरविंद झा यांनी सांगितले.

‘कौशंबी’बाहेर गर्दी, केजरीवाल मात्र शांत
दिल्ली निवडणुकीची धामधूम आटोपल्यानंतर आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना दोन दिवस शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. सध्या कौशंबी या त्यांच्या निवासस्थानाबाहेर प्रसारमाध्यमांची गर्दी झाली आहे. मतदानानंतर केजरीवाल यांनी विपश्यना आणि योगासने सुरू केली आहेत. त्यांचा मूड एकदम रिलॅक्स दिसत आहे.