आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tibetans Protest Against Chinese Foreign Minister\'s Visit

चीनचा भारताकडे मैत्रीचा हात, परराष्ट्रमंत्री स्वराज यांना दिले भेटीचे निमंत्रण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतासोबत मैत्रीचे संबंध वाढविण्यासाठी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग आज (रविवार) दिल्लीत आले आहेत. त्यांनी देशाच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली आणि दोन्ही नेत्यांदरम्यान द्विपक्षीय चर्चा झाली. सात सदस्यांच्या शिष्टमंडळासह भारत दौ-यावर आलेले वांग सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. वांग यांच्या भारत दौ-याचा निषेध करण्यासाठी तिबेट शरणार्थींनी दिल्लीत निदर्शने केली.
वांग यी आणि सुषमा स्वराज यांच्या भेटी दरम्यान वांग यांनी त्यांना चीन भेटीचे निमंत्रण दिले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, वांग मोदींची भेट घेतील तेव्हा त्यांनाही ते चीन दौ-याचे निमंत्रण देण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीत व्यापार आणि गुंतवणूकीवर प्रामुख्याने चर्चा झाली. दोन दिवसांच्या भारत दौ-यावर आलेले वांग यी यांचा मुख्य उद्देश नव्या सरकारसोबत सामंजस्याचे संबंध निर्माण करणे असल्याचे कळते. मोदींनी देखील पंतप्रधान झाल्यानंतर शेजारी देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे वांग यांची भारत भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. चीनचे राष्ट्रपती झी जिपिंग यांचे दूत म्हणून वांग यी हे मोदी आणि राष्ट्रपतींची औपचारिक भेट घेतील, त्यासोबतच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल आणि इतरही भारतीय अधिका-यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
61 वर्षीय वांग हे अनुभवी राजकारणी आहेत. भारतातील नव्या सरकारसोबत चीनची ही पहिली औपचारिक भेट आहे. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर चीनच्या पंतप्रधानांनी दुरध्वनीद्वारे मोदींना शुभेच्छा दिल्या होत्या.

पुढील स्लाइडमध्ये, तिबेटी शरणार्थींची निदर्शने..