नवी दिल्ली - वन्यप्रेमींसाठी खुशखबर आहे. चार वर्षांत वाघांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे. २०१०मध्ये देशात १,७०६ वाघ होते. २०१४ मध्ये त्यात वाढ होऊन ही संख्या २,२२६ वर पोहोचली आहे. जगातील ७० टक्के वाघ आता भारतात आहेत.
पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दर चार वर्षांत एकदा होणा-या वाघांच्या गणनेची आकडेवारी मंगळवारी जाहीर केली. कर्नाटक, उत्तराखंड, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ राज्यांत वाघांची संख्या वाढली. सर्वांत जास्त ४०६ वाघ कर्नाटकमध्ये आहेत. त्यानंतर उत्तराखंड (३०६) आणि मध्य प्रदेशचा (३०८) चा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ५ वाघ असल्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे.