आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिळक ब्रिटिशांचे एजंट होते, काटजू यांचे वादग्रस्त विधान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकमान्य टिळक यांना स्वातंत्र्यसेनानी मानले जाते, पण माझ्या मते टिळक हे रूढीवादी आणि हिंदू दहशतवाद्यांचे प्रचारक आणि ब्रिटिशांचे एजंट होते. त्यांची विचारधारा, वक्तव्ये आणि कार्यांतून त्याला दुजोरा मिळतो, असे वादग्रस्त विधान सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी आपल्या ब्लाॅगवर केले आहे. यासाठी लोक मला शिव्या घालतील, पण मी पर्वा करत नाही, असेही काटजू यांनी म्हटले आहे. काटजू म्हणतात, टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. तेव्हा हिंदूंना गोरक्षा आणि मोहर्रममध्ये सहभागी न होण्याचे आवाहन केले. याशिवाय १८९१मध्ये त्यांनी विवाहाचे वय १० वरून १२ वर्षे करण्याला त्यांनी विरोध केला होता. महात्मा गांधी आणि टिळकांनी राजकारण आणि धर्माची सरमिसळ करण्याचे काम केले. असेही काटजू यांनी म्हटले आहे.

काटजू पुढे म्हणतात की, सहा वर्षे मंडालेच्या तुरुंगात राहून आल्यावर तर टिळक पूर्णपणे ब्रिटिशांचे एजंट असल्यासारखेच काम करत होते. पहिल्या जागतिक युद्धात ब्रिटिश लष्करात भारतीयांच्या भरतीचे त्यांनी समर्थन केले होते.