आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK म्हणाले- भारतासोबत कायम शत्रुत्व घेऊन जगू शकत नाही, आम्ही 70 वर्षे वाया घालवली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी चर्चेची तयारी दाखवली आहे. - Divya Marathi
पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी चर्चेची तयारी दाखवली आहे.
नवी दिल्ली - भारतासोबतच्या वाढत्या तणावादरम्यान पाकिस्तानने चर्चेतून प्रश्न सोडवण्याची गरज व्यक्त केली आहे. भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित म्हणाले, 'आम्ही कायम भारतासोबत शत्रुत्व पत्करुन राहू शकत नाही. 70 वर्षे आम्ही वाया घालवली आहे. आता वेळ आली आहे की दोन्ही शेजाऱ्यांनी ठरविले पाहिजे की आम्हाला याच परिस्थिती राहायचे की नवीन सुरुवात करायची.'
आणखी काय म्हणाले बासित
- मीडिया रिपोर्टनुसार, अब्दुल बासित यांनी दोन्ही देशांदरम्यानच्या चर्चेवर जोर दिला.
- ते म्हणाले, दोन्ही देशांनी आपसातील मतभेद दूर केले पाहिजे, ज्यामुळे दोन्ही देशांदरम्यान सहकार्य वाढीस लागून कोणत्याही अडचणींशिवाय पुढे जाता येईल.
- चर्चेसाठी पाकिस्तान तयार असल्याचे सांगतांना बासित म्हणाले, भारताकडून यावर सहकार्य मिळताना दिसत नाही.
आधी ठरविले पाहिजे आपल्याला काय पाहिजे
- पाक उच्चायुक्त बासित म्हणाले, 'आमचे सरकार धैर्यशील आहे आणि ते चर्चेला सुरुवात होण्याची वाट पाहू शकते.'
- परंतू मला वाटते आम्ही 70 वर्षांचा वेळ वाया घालवला आहे. आता हे ठरविले पाहिजे की आपल्याला नेमके काय पाहिजे आहे ?
- 'आम्हाला सध्याच्या स्थितीतच राहायचे आहे की नवे नाते निर्माण करुन नवी सुरुवात करायची आहे.'
कसा आणि का वाढला तणाव
- बासित यांचे हे वक्तव्य इंडो-पाक रिलेशनशिपवरील एका चर्चेदरम्यान समोर आले आहे.
- भारतात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या दहशतवादी हल्यांनी उभय देशांदरम्यानचे संबंध विकोपाला गेले आहेत.
- या वर्षी पठाणकोट, उरी आणि नगरोटा येथील लष्करी तळांवर दहशतवादी हल्ले झाले. यात अनेक भारतीय जवान शहीद झाले.
- 29 सप्टेंबर रोजी भारताने पाक व्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करुन 40 दहशतवाद्यांना ठार केले होते.
- त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि नियंत्रण रेषेवर पाककडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आले आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...