आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी तर आहे हाऊसवाइफ, कंपन्यांची माहिती नाही!- टीना अंबानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ‘मी तर हाऊसवाइफ आहे. एक रुग्णालय चालवते. रिलायन्सच्या अनिल धीरुभाई अंबानी गु्रपच्या (एडीएजी) निर्णयांशी माझा संबंध नाही. एकाही कंपनीशी माझा थेट संबंध नाही...’ ही साक्ष आहे रिलायन्स एडीएजीचे चेअरमन अनिल अंबानी यांच्या पत्नी टीना यांची. शुक्रवारी विशेष न्यायालयात त्या हजर झाल्या. टू-जी घोटाळ्याच्या सुनावणीत त्यांनी ही साक्ष दिली.

सीबीआयने साक्षीदार म्हणून त्यांना हजर केले. गुरुवारी अनिल अंबानींनी साक्षीत ‘लक्षात नाही, माहीत नाही’, अशीच उत्तरे दिली होती. एडीएजीशी संबंधित दस्तऐवज न्यायालयात दाखवण्यात आले तेव्हा टीना अंबानी यांनीही साक्ष देताना तोच मार्ग अवलंबला.