आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरुपती बालाजी दिल्ली दौऱ्यावर, प्रथमच आंध्र प्रदेशबाहेर, इतर राज्यांतही जाणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ५० हजार हजार कोटींपेक्षा जास्त संपत्तीसह देशातील सर्वात श्रीमंत देव असलेले तिरुपती बालाजी सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. बालाजी आपल्या संपूर्ण लवाजम्यासह आंध्र प्रदेशच्या बाहेर एखाद्या राज्याच्या दौऱ्यावर गेले आहेत.

दिल्लीच्या नेहरू स्टेडियममध्ये ८ नोव्हेंबरपर्यंत वैभवोत्सवमचे आयोजन करण्यात येत आहे. तेथे बालाजीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मुख्य कार्यक्रम ७ नोव्हेंबरला आहे. पण तेथे तिरुपतीला जसे पाठ होतात तसेच पाठ सुरू आहेत. दर्शनासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) कुठलीही कसर सोडलेली नाही. टीटीडीकडेच श्री वेंकटेश्वरम स्वामी मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. २५ ट्रकमध्ये पूजेचे साहित्य आणण्यात आले आहे. सर्व पूजा-अनुष्ठान संपन्न करण्यासाठी ३५ पुजारी आणि मंदिराचे २५० कर्मचारीही भगवान बालाजीसोबत आले आहेत. मंदिर सजवणारे कारागीरही तिरुमलाहून आले आहेत. देवाच्या मूर्तीव्यतिरिक्त पडदेही तिरुमला मंदिरातून आणले आहेत. प्रसादाचे लाडू आणि प्रसाद तयार करण्याचे साहित्यही मागवण्यात येत आहे. देवाच्या मूर्तीसाठी तिरुमला आणि बंगळुरू येथून फुले मागवण्यात येत आहेत. मंदिराबाहेर वैभवोत्सवम मंदिराच्या परिसराबाहेर साजरा करण्याची योजना स्वर्ण भारत ट्रस्टच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आणि भाजप नेते व्यंकय्या नायडू यांची मुलगी दीपा वेंकट यांची आहे. दिल्ली दौऱ्यात सर्वांना बालाजीचे दर्शन मोफत घेता येईल. एवढेच नाही तर दैनंदिन सेवा आणि सोमवारच्या विशेष पूजेपासून पुराभिषेकमपर्यंतचे उत्सव नेहरू स्टेडियममध्ये होतील. तेथे जमिनीवर बसण्याची, खुर्चीची व्यवस्था आहे. दर्शनासाठी शुल्क नाही. पुरुषांनी धोतर आणि महिलांनी साडी अथवा सलवार सूट घातला असल्यास त्यांना अगदी जवळ जाण्याची संधी मिळत आहे. दररोज संध्याकाळी प्रांगणात निघणारी मिरवणुकीत सर्व जण सहभागी होऊ शकतात आणि पालखीला स्पर्शही करू शकतात. तसे तिरुपतीत शक्यच होत नाही.

गरुड वाहनाने दाखल
उत्सवासाठी तिरुपती बालाजीची मूर्ती विशेष गरुड वाहनाने आणण्यात आली. मूूळ मूर्ती तेथेच विराजमान आहे. जे लोक तिरुपतीला जाऊ शकत नाहीत, त्यांना बालाजीचे दर्शन व्हावे म्हणून सर्व राज्यांच्या राजधानीत एक-एक देवस्थानम स्थापित करण्याची टीडीडीची योजना आहे. त्यासाठी एक योजना तयार केली जात आहे.