आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TNA Wrestler Mahabali Shera Defeat Mexico Fighter Uno

परदेशी पहिलवानाला 2 मिनिटात धूळ चारणारा भारतीय, पाहा Photo

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - भारतीय पहिलवान महाबली शेरा अमनप्रित.
मोहाली - येथे राहणारा भारतीय प्रोफेशनल रेसलर महाबली शेरा याने 26 जानेवारी रोजी टोटल नॉनस्टॉप अॅक्शन (टीएनए) मध्ये मेक्सिकोच्या एका फायटरला दोन मिनिटांत चित केले. विशेष म्हणजे शेराची ही पहिलीच फाइट होती.
टीएनएमधील शेराची पहिली फाइट
शेराच्या या विजयाबरोबरच त्याच्या घरात विजयाचा जल्लोष सुरू झाला. मोहालीच्या फेज-1 मध्ये जिम चालवणारा त्याचा भाऊ यादविंदर सिंगने सांगितले की, त्या रात्री कुटुंबातील सगळे सदस्य आणि मित्र रात्री 8.30 वाजता टिव्हीसमोर जमले होते. त्यांचा भाऊ महाबली शेराची त्यादिवशी पहिली फाइट होणार होती.
दोन मिनिटांत केले चित
फाइट सुरू होण्यापूर्वी सर्वांनाच शेरा जखमी होण्याची भीती वाटत होती. पण फाइट सुरू होताच सगळ्या भीती संपल्या. कारण शेराने दुसर्‍या पहिलवानाला अवघ्या दोन मिनिटांत चित केले. अमन जिंकल्यामुळे यादविंदर आणि त्याच्या मित्रांनी एकच जल्लोष केला. याठिकाणी पोहचण्यासाठी शेराला बरीच मेहनत करावी लागल्याचे त्याच्या भावाने सांगितले.

यादविंदरही करणार रेसलिंग
महाबली शेराचा भाऊ यादविंदर याने सांगितले की, त्यालाही भावाप्रमाणे रेसलिंगमध्ये करिअर करायचे आहे. पुढच्या वर्षी भावाबरोबर आपणही या क्षेत्रात नशीब आजमावणार असल्याचे त्याने सांगितले. त्यासाठी त्याने आतापासूनच तयारीही सुरू केली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा PHOTOS...