नवी दिल्ली - अंदमान-निकोबार बेटांना दक्षिणपूर्व आशिया, चीन, जपान आणि इतर पूर्वेकडचे देश यांचे समुद्री मार्ग आहेत. त्यामुळे या बेटांचे भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. हेच हेरून या ठिकाणी भारताने पोसिएडोन-81 विमानासोबत येथे ड्रोन तैनात केलेत. शिवाय नौसेना आणि भारतीय वायू दल येथे इस्राएल बनावटीचे सर्चर-2 कॅटेगरीचे विमानसुद्धा अस्थायी स्वरुपात उतरवणार आहे.
चीनला कसे उत्तर देत आहे भारत ?
- हिंदी महासागराच्या क्षेत्रात (आईओआर) भारताने गस्त वाढवली आहे.
- सरकारने या परिसरात दोन आठवड्यांपूर्वी पोसिएडोन-81 तैनात केले आहे.
- साधारण ड्रोन्सच्या ऐवजी आता स्पाय ड्रोन या क्षेत्रात उड्डाण करतील.
- सर्वात धोकादायक पाणबुडी शोधून तिला नेस्तनाबुत करण्याचे कौशल्य
पोसिएडोन-81 या लढाऊ विमानामध्ये आहे.
का केले यांना तैनात ?
- चीनच्या हालचाली पाहता पोसिएडोन-81 आणि स्पाय ड्रोन यांना तैनात केले गेले.
- या ठिकाणी चीन न्यूक्लिअर आणि कन्वेंशनल पाणबुड्या वाढवत आहे. यामुळे समुद्री क्षेत्राला धोका निर्माण झाला आहे.
- वर्ष 2009 मध्ये भारताने अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून 8 पी-81 लढाऊ विमानांची खरेदी केली होती. त्यांना आयएनएस रजलीवर तैनात केले आहे. रजाली तमीळनाडूच्या अराकोनम कोस्टचर गस्त घलत आहे.
द्वीपसमूहात भूदल, वायूदल, नौदलाचा संयुक्त कमांड
हे द्वीपसमूह म्हणजे, भारतासाठी अशी एकमेव जागा आहे ज्या ठिकाणी भूदल, वायूदल आणि नौदल तिघांचे एक संयुक्तिक कमांड आहे. तिथे भूदलाचे सहा हजारांहून जास्त सैनिक आहेत. शिवाय नौदलाचा मोठा बेस आहे, याशिवाय कारनिकोबार बेटावर वायूदलाचाही एक बेस आहे. यांचा वापर आपण सामरिकदृष्ट्या करू शकतो. कारण सगळे समुद्री रस्ते या द्वीपसमूहामधून जातात.तसेच भारतापासून ते लांब असल्यामुळे चिनी नौदलाला तेथून बंगालच्या उपसागरातच अडवता येऊ शकते. चिनी नौदलाला भारताजवळ येण्यापासून रोखता येऊ शकते.
पुढील स्लाइडवर वाचा, किती धोकादायक आहे पोसिएडोन-81?