आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • To Sell Products Using The Gods Is Wrong Supreme Court

रामायण-कुराणसारखे पवित्र धर्मग्रंथ ट्रेडमार्क नाहीत : सुप्रीम कोर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कोणतीही व्यक्ती रामायण, कुराण, बायबल आणि गुरू ग्रंथसाहिबसारख्या पवित्र धर्मग्रंथ आणि शास्त्रांच्या नावाचा वापर आपली उत्पादने वा सेवा विकण्यासाठी ट्रेडमार्कच्या रूपात करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल सुनावला आहे.
न्यायमूर्ती रंजन गोगोई आाणि आर. के. अग्रवाल यांच्या खंडपीठाने आपल्या निकालात म्हटले की, देव आणि पवित्र ग्रंथांच्या वापराची परवानगी दिल्यास लोकांच्या भावनांना ठेच पोहोचू शकते. बिहारमधील लालबागू प्रियदर्शी यांच्या अपिलावर कोर्टाने हा निकाल दिला. आपली अगरबत्ती आणि अत्तर विकण्यासाठी प्रियदर्शींना रामायणाचा वापर ट्रेडमार्कच्या रूपात करायचा होता. मात्र, बौद्धिक संपदा अपिलीय बोर्डाने त्याची परवानगी नाकारली. या आदेशाला आव्हान देत प्रियदर्शींनी सर्वेाच्च न्यायालयापुढे ही मागणी केली होती. न्यायमूर्तींनी त्याला स्पष्ट नकार दिला.

या १६ पानी निकालात म्हटले आहे की, ‘रामायण’ हे महर्षी वाल्मीकी यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे शीर्षक सुचवते. त्याला आपल्या देशात हिंदूंचा महत्त्वाचा धर्मग्रंथ म्हणून समजले जाते. यासाठी ट्रेडमार्कच्या रूपात रजिस्टर्ड करण्याची मंजुरी दिली जाऊ शकत नाही. अगरबत्तीच्या खोक्यावर भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या फोटोच्या वापरावरही कोर्टाने आक्षेप व्यक्त करत सांगितले, देवदेवतांचा फायदा उचलला जात असल्याचे यावरून स्पष्ट होते. कोणत्याही परिस्थितीत त्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.
प्रियदर्शी १९८१ पासून ‘रामायण’चा ट्रेडमार्कच्या रूपात वापर करत आहेत. जाहिरातींतही ते त्यांनी वापरले आहे. सामान पाठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खोक्यांवरही तो वापरला जातो. यामुळे हे उत्पादन इतके प्रसिद्ध झाले आहे की इतर कुणी हा ट्रेडमार्क वापरला तर व्यापारी व सर्वसामान्यांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. तथापि, कोर्ट पुढे म्हणाले, ‘रामायण’च्या मागेपुढे एखादा शब्द वा डिझाइन जोडली जाते. पण त्याची लांबी आणि रंगरूप तसेच असेल तर धार्मिक ग्रंथ म्हणून ‘रामायण’ अापले महत्त्व गमावून बसेल.ट्रेडमार्क म्हणून धर्मग्रंथ वापरण्यास कायदा रोखू शकत नाही, तसेच यामुळे हिंदूच्या भावना दुखावल्या गेल्याचे पुरावेही नाहीत, असा युक्तिवाद प्रियदर्शींनी कोर्टात केला होता. तो फेटाळत सर्वोच्च न्यायालय म्हणाले, कायद्यान्वये, कोणतीही व्यक्ती आपली उत्पादने विकण्यासाठी देवी-देवतांचा फायदा उचलू शकत नाही.