आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • To Support The Congress Longer Opposition With Pawar

काँग्रेसला शह देण्यासाठी अाता पवारांसह विरोधकांचाही शड्डू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पावसाळी अधिवेशन गोंधळात वाया घालवणाऱ्या काँग्रेसला शह देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह समाजवादी पार्टी, तृणमूल, आपसह इतर विरोधी पक्षांनी एकीचे बळ दाखवण्याचे ठरवले आहे. लोकसभेतील आपले संख्याबळ काँग्रेसपेक्षा मोठे करण्याची ही रणनीती आहे.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ललित माेदी प्रकरणावरून राजीनामा द्यावा म्हणून पावसाळी अधिवेशनात काँग्रेसने गाेंधळ घातला. संसदेचे कामकाज चालू देणार नाही असे जाहीर करून "संपुअा-२' मध्ये भाजप जसा वागला त्याचे उट्टे काढण्याचा हेकेखाेरपणा काँग्रेसने कायम ठेवला. प्रारंभी या पक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. परंतु चौथ्या अाठवड्यातही काँग्रेसने अडथळे कायम ठेवल्याने या पक्षांनी भूमिका बदलली.

मुलायमसिंह यादव यांनी गाेंधळ थांबवा अशी विनंती केली हाेती. परंतु काँग्रेसने त्यांचे म्हणणे ऐकले नाही. त्यामुळे विधेयके रखडली व महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागत नसल्याने या सर्व पक्षांनी बुधवारी काँग्रेसला वगळून रणनीती अाखली अाहे.

महाआघाडीची पत्रकार परिषद, ३० रोजी जाहीर सभेत मोदींना उत्तर
पवारांच्या ६-जनपथवर बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ६-जनपथ या िनवासस्थानी सायंकाळी ६ पासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव, फारुख अब्दुल्ला, जनता दल संयुक्तचे अध्यक्ष शरद यादव आणि के. सी. त्यागी यांची बैठक पार पडली. अडीच तास ही बैठक चालली. मुलायम यांनी बैठकीत काँग्रेसला पाठबळ दिल्याबद्दल पश्चात्तापाची भावना व्यक्त केल्याचे कळते.

लाेकसभेत काँग्रेसचे ४४ खासदार
समाजवादी पार्टी (५), तृणमूल काँग्रेस (३४), राष्ट्रवादी काँग्रेस (६), अाम अादमी पार्टी (४), जनता दल (संयुक्त) (२) , राष्ट्रीय जनता दल (४) असे संख्याबळ ५५ हाेते. राज्यसभेत काँग्रेसचे संख्याबळ ६८ अाहे. घटक पक्ष एकत्र आले तर हे संख्याबळ ४७ अाहे. राज्य विधानसभांमध्ये काँग्रेसचे संख्याबळ ९६८, तर उपरोक्त पक्षांचे ६६३ अाहे. ही गाेळाबेरीज करत संसदेत सक्षम िवराेधी पक्ष तयार करण्याची शरद पवार, मुलायमसिंह यादव व ममता बॅनर्जी यांची रणनीती यशस्वी हाेऊ शकते. बैठकीला िदल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येऊ शकले नाहीत.

मुलायमसिंह यादव : अधिवेशनातील अडथळे दूर करण्यासाठी ही बैठक होती. शरद पवार याचे नेतृत्व करीत अाहेत. देशात अनेक प्रश्न अाहेत. लाेकप्रतिनिधी या नात्याने अाम्हाला ते प्रश्न साेडवायचे अाहेत.
शरद पवार : ही काँग्रेसविरोधी बैठक नव्हती. कामकाजात सुसूत्रता अाणण्याचा प्रयत्न अाहे. पुढील बैठक २२ सप्टेंबरला शरद यादव यांच्या िनवासस्थानी हाेईल आणि संसदीय कामकाजाची पुढील रणनीती ठरवली जाईल.