आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी टीममध्ये आज २० नव्या मंत्र्यांचा समावेश; पर्रीकर संरक्षणमंत्री, रुडी यांचीही वर्णी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिला-वहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी होत आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी दुपारी दीड वाजता भाजपचे मनोहर पर्रीकर आणि मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासह २० नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. काही मंत्र्यांच्या खात्यांत बदल तर काही राज्यमंत्र्यांना बढती मिळू शकते.

पंतप्रधानांनी सर्व मित्रपक्षांना एक फॉरमॅट पाठवून मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी नावे मागवली होती. त्यानुसार तेलगू देसम पक्षाने वाय. एस. चौधरी यांचे नाव दिले आहे. मोदी सरकार मेमध्ये सत्तेत आल्यानंतर हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार आहे. मंत्रिपदाची शपथ घेत असलेल्या सर्वांना मोदींनी रविवारी सकाळी चहापानासाठी आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले आहे.

यांचा होणार मंत्रिमंडळात समावेश
मनोहर पर्रीकर
५९ वर्षांचे पर्रीकर आयआयटी-मुंबईचे माजी विद्यार्थी. गोव्यातून जाणारे पहिले कॅबिनेट.
मुख्तार अब्बास नक्वी
भाजपचे मुस्लिम नेते. पक्षाचे उपाध्यक्ष व राज्यसभा खासदार. वाजपेयी सरकारमध्ये राज्यमंत्री.
हंसराज अहिर
चंद्रपूरमधील भाजपचे तीन वेळचे खासदार. बहुचर्चित कोळसा घोटाळा उघडकीस आणला.
विजय सांपला
भाजपचे दलित नेते. पंजाबच्या होशियारपूरमध्ये व्यवसायाने मजूर आता खासदार बनले.
जे.पी. नड्डा
मोदींशी जवळीक. भाजपचे सरचिटणीस. हिमाचल, पंजाब व जम्मू-काश्मिरातील चेहरा.
रामकृपाल यादव
बिहारातील यादवांचे बडे नेते. पाटलीपुत्रमधून लालूंची कन्या मिसाला हरवून लोकसभेवर.

सध्या केंद्रात ४५ मंत्री
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सध्या ४५ मंत्री आहेत. त्यापैकी २३ कॅबिनेट तर २२ राज्यमंत्री आहेत. स्वतंत्र प्रभार असलेले १० राज्यमंत्री आहेत.

यांचीही वर्णी लागण्याची शक्यता : भाजपमधून : बंडारू दत्तात्रेय (तेलंगण), चौधरी वीरेंद्रसिंह (हरियाणा), जयंत सिन्हा (माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे पुत्र व झारखंडमधून खासदार) , गिरिराज सिंह (बिहारचे मजूर नेते), कर्नल सोनाराम, सांवरमल जाट, राज्यवर्धनसिंह राठोड (राजस्थान) , बाबुल सुप्रियो (पश्चिम बंगाल), साध्वी निरंजन ज्योती (उत्तर प्रदेश), रमेश
बैन्स (छत्तीसगड), अजय टमटा (उत्तराखंड). }तेदेपातून : वाय.एस. चौधरी