नवी दिल्ली - दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारपासून केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्राच्या दौ-यावर जात असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी गुरुवारी दिली. दरम्यान, दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी राज्याने केंद्राकडे ३ हजार ९२४ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकारांना
दिली.
मराठवाडा आणि विदर्भात तीव्र दुष्काळ आहे. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी राज्याला ४००० कोटी रुपयांची गरज असल्याचे शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी लोकसभेत सांगितले. राज्यातील पंधरा जिल्ह्यातील ११८०० गावे दुष्काळात होरपळत आहेत.