आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Congress Leader Meet For Loksabha Candidates Issue

काँग्रेस-राष्ट्रवादीत 26-22चे सूत्र? लोकसभा जागावाटप, आज दिल्लीत बैठक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लोकसभेसाठी महाराष्ट्रातील जागावाटपावरून काँग्रेस व राष्ट्रवादीदरम्यानचा पेच सोडवण्यासाठी सोमवारी दिल्लीत बैठक होत आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेस नेते अहमद पटेल व ए. के. अँटनी यांच्यात ही चर्चा होईल. महाराष्ट्रात राष्ट्रवादीला 19 जागा दिल्या जाव्यात, अशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरेंची इच्छा आहे.

राष्ट्रवादीला 48 जागांमध्ये 26-22 असे सूत्र हवे आहे. 1999 पासून सत्तेत असलेल्या व 2004 पासून लोकसभेसाठी निवडणूकपूर्व आघाडी करून लढणार्‍या या पक्षांत जागावाटपावरून सध्या वाद असून पवार यांनी काँग्रेसवर दबाव वाढवला आहे. हा पेच अधिक वाढत असल्याचे लक्षात आल्यावर अखेर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला याची दखल घ्यावी लागली.

काही जागांची अदलाबदल : काँग्रेसला 26 व राष्ट्रवादीला 22 जागा सोडून मराठवाड्यातील जालना, हिंगोलीसह उ. महाराष्ट्रातील काही जागांच्या अदलाबदलीवरही बैठकीत एकमत होऊ शकते. मात्र, ही घोषणा बुधवारी केली जाण्याची शक्यता आहे.