आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज भारतासन; अवघे जग साजरा करणार पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतासह अवघे जग रविवारी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहे. भारताच्या नेतृत्वाखाली १९१ देशांच्या २५१ शहरांत योगासने केली जातील. मुख्य सोहळा दिल्लीत राजपथावर सकाळी सात वाजेपासून सुरू होईल. ३५ मिनिटांच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ३५ हजार लोक योगासने करतील.

सोहळ्यात १५२ देशांच्या विदेशी मिशनच्या राजनैतिक अधिकारी आमंत्रित आहेत. आयुष मंत्रालयानुसार हा सोहळा एकाच जागी सर्वात मोठे योग प्रदर्शन वा क्लासच्या माध्यमातून गिनीज बुकात नोंदवला जाईल. गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रात मोदींनी मांडलेल्या योग दिन साजरा करण्याच्या प्रस्तावाला विक्रमी १७७ देशांनी पाठिंबा दिला. युनोच्या कार्यक्रमात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज उपस्थित राहतील.

राजपथावर मुख्य कार्यक्रम, पंतप्रधानांसह ३५ हजार जणांची योगासने

राजपथावर सुरक्षा
>१८ डीसीपी, ३० कंपन्या आणि ५००० सुरक्षारक्षक तैनात असतील.
>पतंग, ग्लायडर, फुगे आणि ड्रोनच्या उड्डाणांवर असेल बंदी.
>श्वानपथक आणि बॉम्बनाशक पथकेही असतील तैनात.
>२००० मोठ्या डिजिटल सिनेमा स्क्रीन लावल्या आहेत राजपथावर.
>लखनऊ, कोलकाता आणि पाटण्यातही मोठ्या प्रमाणात आयोजन.
>राज्यांना जिल्हा व पंचायत मुख्यालयांवर कार्यक्रमांचे आदेश.
>१० आणि १०० रुपयांच्या नव्या नोटा, टपाल तिकिटेही होणार जारी.

रामदेव, श्रीश्रींचा पुढाकार
सरकारव्यतिरिक्त अनेक संस्थांनी अंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केले आहेत. योगगुरू रामदेव बाबा यांनी एक लाख गावांपर्यंत पाेहोचण्यासाठी १,१०० कार्यक्रम आयोजित केले आहेत. श्रीश्री रविशंकर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून पाच कोटी लाेकांपर्यंत योग पोहोचवतील.

अवघ्या जगभरात उत्साह
योग दिनाची जगभरात तयारी सुरू आहे. आयफेल टॉवरवर दोन हजार लोक योगासने करतील. भारतासह लंडन, मेलबाेर्न, दुबई, बीजिंग, बुडापेस्ट, हो चिन्ह मिन, हाँगकाँग, पोर्ट लुईस, पॅरिस, जकार्ता, बर्लिन, न्यूयार्क, डब्लिन, तालिन और बोगोटासह प्रमुख शहरांत योग कार्यक्रम होत आहेत.

मोदी योगासने करतात का? पुतीनचा प्रश्न
मोदींनी योगासाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू केल्याची माहिती रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांंना देण्यात आली. त्यांनी पहिला प्रश्न केला - मोदी स्वत: योग करतात का? जी व्यक्ती

जगभरात याेगाचा प्रसार करू इच्छिते तीच स्वत: योग करते का?
२६ हजार कैद्यांचा योग : पंजाबमधील २६ हजार कैदीही रविवारी योग करतील.राज्य सरकारने तुरुंगात कार्यक्रम सक्तीचे केले आहेत. येथे गेल्या दोन वर्षांपासून योगाभ्यास वर्ग होत आहेत. महिला कैद्यांसाठी विशेष सत्र होईल.