आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाटला हाऊस चकमक प्रकरणाची आज होणार सुनावाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बाटला हाऊस एन्काउंटर प्रकरणातील निकाल न्यायालयाने सोमवारी एक दिवसासाठी राखून ठेवला. इंडियन मुजाहिदीनचा संशयित दहशतवादी शहजाद अहमदला या प्रकरणी मंगळवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

न्यायालयाने 25 जुलै रोजी शहजादला पोलिस निरीक्षक मोहनचंद्र शर्मा यांची हत्या आणि अन्य पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. तेव्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेंद्रकुमार यांनी 29 जुलै ही शिक्षा सुनावण्याची तारीख निश्चित केली होती. सोमवारी फिर्यादी आणि बचाव पक्षांचे युक्तिवाद पूर्ण करण्यात आले. शहजादला फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी विशेष सरकारी वकील सतविंदर कौर यांनी केली. दिल्लीमध्ये सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या सहा दिवसांनंतर बाटला हाऊस एन्काउंटर झाले होते. त्यात पोलिस निरीक्षक शर्मा आणि दोन संशयित दहशतवादी आतिफ अमीन आणि मोहंमद साजीद मारले गेले होते.