आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक दिवस हिजाब-टोपी घातली नाही तर धार्मिक श्रद्धा नष्ट होणार का? -कोर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- हायटेक नक्कलबाजीमुळे रद्द झालेली अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेशपूर्व चाचणी अर्थात एआयपीएमटी देशभरात शनिवारी दुसऱ्यांदा होत आहे. या पुनर्परीक्षेसाठी सीबीएसईने प्रथमच ५० हून जास्त नियम निश्चित केले आहेत. ५० शहरांतील १०६५ परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेसाठी एक मिनिटाचाही उशीर चालणार नसल्यामुळे विद्यार्थ्यांना कसेही करून सकाळी ९.३० वाजता हजर राहावेच लागेल.
सीबीएसईने ‘काय आणावे, काय आणू नये’ याची लांबलचक यादीच जाहीर केली. एवढ्या मोठ्या संख्येने वस्तूंवर बंदी घातलेली ही देशातील पहिलीच परीक्षा असावी. मुस्लिम मुलींना हिजाब घालण्यावर बंदी हे सीबीएसईचे सर्वात कठोर पाऊल होते. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. मात्र शुक्रवारी कोर्टाने हस्तक्षेपास नकार दिला.

‘तुम्ही एक दिवस हिजाब किंवा टोपी घातली नाही तर तुमची धार्मिक श्रद्धा नष्ट होणार नाही,’ असे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू म्हणाले.

सीबीएसईने बुधवारी स्पष्टीकरणही दिले होते. ड्रेसकोड हा उशीर होऊ नये म्हणून केवळ सल्ला आहे. पारंपरिक व सोयीचे कपडे घालता येतील; परंतु अशा विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग टाइमच्या अर्धा तास लवकर यावे, असे त्यात म्हटले होते.

बंदी : अंगठी अाणि बांगड्यांवरही
-दुपट्टा आणि लांब बाह्यांचा शर्ट, टी- शर्ट, कुर्ती.
-हिजाब, टोपी, मफलर. घड्याळ, कॅप, बंद बूट, पायमोजे.
-चष्मा, बेल्ट, पर्स, बांगड्या, झुंबर, नाकातील नथ, अंगठी.
-कोणत्याही प्रकारचे लॉकेट, ताईत, पेंडुलम.
-मोबाइल फोन, ब्ल्यूटूथ, मायक्रोफोन, पेजर, हेल्थ बँड, कॅमेरा, ट्रान्झिस्टर, इअरफोन, कपॅसिटर, रेझिस्टन्स, डायोड, टायोड आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे.
-पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर, कंपासपेटी.

कोणतेही उपकरण परीक्षागृहात पोहोचू नये म्हणून उमेदवारांच्या कानाची बॅटरी लावून तपासणी होणार.

परवानगी; हाफ शर्ट, चप्पल
- ओपन स्लिपर्स. हाफ बाह्यांचा शर्ट.
-मुलींसाठी हाफ बाह्यांचा कुर्ता.
-मुलांसाठी ट्राऊझर, मुलींसाठी सलवार.
-ओळखपत्र, परीक्षा प्रवेशपत्र, एक पासपोर्ट आकाराचे व एक पोस्टकार्ड आकाराचे छायाचित्र.
इलेक्ट्रॉनिक उपकरणे पकडता यावीत म्हणून परीक्षागृहात जॅमर लावणार.

प्रत्येक उमेदवाराला एक शपथपत्र व एक घोषणापत्र भरून द्यावे लागेल. प्रत्येक केंद्राबाहेर निमलष्करी दल तैनात राहील. बोर्डाने सर्व राज्यांतून कुमक मागवली.

एवढी कडक का?
३ मे २०१५ रोजी झालेल्या एआयपीएमटीमध्ये हायटेक नकला झाल्याचे उघडकीस आले होते. रोहतक पोलिसांनी आरोपींकडून मोबाइल, मायक्रोचिप लावलेली अंतर्वस्त्रे जप्त केली होती. मोबाइलमध्ये व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवलेली पेपरची आन्सर की मिळाली होती. त्यानंतर १५ जून रोजी सुप्रीम कोर्टाने परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षेचे आदेश दिले होते. पुनर्परीक्षेसाठी सीबीएसईला ३८ कोटी अंदाजित खर्च येत आहे. पुनर्परीक्षेत नकलेची कोणतीच संधी मिळू नये, म्हणून कठोर नियम केले. जॅमर वगैरेंची व्यवस्था करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.