आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज होणार संघ निवड; किताबाच्या बचावासाठी लढेल भारतीय संघ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अनिश्चिततेचे ढग दूर करताना सर्वानुमते एक जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडिया खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघ किताबाच्या बचावासाठी लढेल. 

भारतीय संघाची निवड साेमवारी केली जाणार आहे. बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेने (एजीएम) हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मागच्या महिन्यात दुबईत आयसीसीच्या बैठकीत महसूल प्रकरणावर झालेल्या मतदानात भारताचा पराभव झाल्यानंतर आयसीसीवर दबाव निर्माण करण्यासाठी बीसीसीअाय चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात होती.   

चाहते, खेळाडू आणि सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त प्रशासकीय समितीच्या (सीओए) दबावात बीसीसीआयने अखेर संघ पाठवण्याचा निर्णय घेतला. बीसीसीअायने या बैठकीत कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी यांना आयसीसीशी चर्चा सुरू ठेवण्याचा सर्वानुमते अधिकार दिला. शिवाय बीसीसीआयने आपले पर्यायी कायदेशीर मार्गही खुले ठेवले आहेत. सीओएचा सल्ला ऐकताना सध्यातरी अायसीसीला कसलीच नोटीस न पाठवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला.   

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ बीसीसीआय आयसीसीच्या महसूलप्रकरणी निर्णयावर असमाधानी होते. आयसीसीच्या कार्यकारिणीने नवी घटना, नवी प्रशासकीय यंत्रणा आणि नव्या महसूल मॉडेलला मान्यता िदली. बीसीसीआय एकमेव मंडळ होते, ज्याने याला विरोध केला. 

नव्या मॉडेलनुसार भारताची कमाई ५७ कोटी डॉलरहून कमी होऊन आता २९ कोटी डॉलर इतकीच झाली आहे. आयसीसीने १० कोटी डॉलर अतिरिक्त देण्याचा प्रस्तावसुद्धा दिला आहे.  

कोच कुंबळे, कोहलीला आधीच सांगितले होते : रॉय  
सीओएचे प्रमुख विनोद रॉय यांनी बीसीसीआयच्या निर्णयाचे स्वागत केले. आयसीसीने १० कोटी अतिरिक्त रक्कम देण्याचे म्हटले आहे. ही रक्कम पुरेशी आहे, असे त्यांनी सांगितले. टीम चॅम्पियन्स ट्रॉफीत नक्की खेळेल, हे कोच कुंबळे आणि कर्णधार कोहलीला सांगितले होते, असेही रॉय यांनी नमूद केले.
बातम्या आणखी आहेत...