आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी याकूबच्या वॉरंटविरोधी याचिकेवर आज निकाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी याकूब मेमनच्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या नियमाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अॅटर्नी जनरल यांच्याकडे स्पष्टीकरण मागवले आहे. अाता याकूबच्या याचिकेवर मंगळवारी निकाल अपेक्षित अाहे.

फाशीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका याकूब मेमनने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर क्युरेटिव्ह पिटिशनशी संबंधित नियम सादर करावेत, असे आदेश न्यायमूर्ती ए. आर. दवे आणि न्यायमूर्ती जोसेफ कुरियन यांच्या खंडपीठाने अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांना दिले. याकूबची क्टुरेटिव्ह पिटिशन २१ जुलैलाच फेटाळण्यात आल्याने आता सर्व कायदेशीर मार्ग थांबले आहेत, असे मत रोहतगी यांनी व्यक्त केले. मात्र, याकूबच्या क्युरेटिव्ह पिटिशनबाबत निर्णय घेताना योग्य पद्धतीचा अवलंब करण्यात आला नाही, असा दावा याकूबचे वकील राजू रामचंद्रन यांनी केला. क्युरेटिव्ह पिटिशन प्रलंबित असताना डेथ वॉरंट काढण्यात आले, पण त्याला इतर कायदेशीर अवलंब करायचा की नाही याचे स्पष्टीकरण देण्याची संधीही टाडा न्यायालयाने
दिली नाही.