आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Today PM Modi Starts Bangladesh Visit, Capital Dhaka Decorated

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: भारत, बांगलादेशात एकूण 22 करार, देशाचा नकाशा बदलणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका- भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये आज एकूण 22 करार करण्यात आले. सीमेवर असलेल्या जमिनीच्या वाटणीचा करार यात सर्वांत महत्त्वपूर्ण आहे. या कराराने भारत आणि बांगलादेशचे नकाशे बदलणार आहेत. यामुळे भारतातील 111 गाव बांगलादेशला तर बांगलादेशातील 51 गाव भारतात सामिल होणार आहेत. तसेच बांगलादेशाला एकूण 17 हजार भारतातील जमीन मिळणार आहे.
करार झाल्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले, की सोनार बांगला हे स्वप्न बंग बंधु शेख मुजीब उर रहमान यांच्या प्रयत्नानंतर साकार झाले आहे. बांगलादेशाशी भारत भावनात्मकरीत्या जुळलेला आहे. तीस्ता नदी जल वाटपाचा तिढा चर्चेच्या माध्यमातून सोडविला जाऊ शकतो.
यावेळी बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, की बांगलादेशाच्या स्वातंत्र्य समरात भारताने केलेली मदत मोलाची आहे. आम्ही ती विसरु शकत नाही.
जमीन वाटपावर लष्कर विशेषज्ञ कर्नल दानवीरसिंग म्हणाले, की बांगलादेशाच्या भूमिचा वापर करुन आपण इशान्येकडील राज्यांचा विकास करु शकतो. चटगांव पोर्टच्या मदतीने या भागात सामान पाठविणे सहज शक्य होणार आहे. इम्फाल-तामू-यंगून-सिंगापूर पॅसेजचा विकास केला जाऊ शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून (शनिवार) दोन दिवसीय बांगलादेश दौर्‍यावर आहेत. दौर्‍याच्या पहिल्या दिवशी मोदींनी ढाका येथील बंगबंधु म्युझियमला भेट दिली. बांगलादेशाचे पहिले राष्ट्रपती आणि विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर्रहमान यांना श्रद्धांजली अर्पण केली. याच ठिकाणी शेख मुजीबुर्रहमान यांची हत्या झाली होती. बांगलादेशात त्यांना राष्ट्रपिताचा दर्जा प्राप्त झाला आहे. बांगलादेशाच्या उभारणीत मुजीबुर्रहमान यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.
यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शहीद स्मारक येथे भेट दिली. सन 1971 मधील मुक्ति संग्रामातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. याशिवाय मोदींनी स्मारक परिसरात मॅग्नोरिया फूलाचे रोपटे लावले. 'उदय पद्म' या रोपट्याला नाव देण्यात आले आहे.

मोदींचा हा पहिलाच बांगलादेश दौरा आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांसाठी हा महत्त्वपूर्ण दौरा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही देशांदरम्यान तब्बल 44 वर्षांपासून सुरु असलेला सीमावादाचा प्रश्न देखील निकाली निघण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी सकाळी पावणे दहा वाजेता बांगलादेशाची राजधानी ढाका येथील विमानतळावर पोहोचले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी प्रोटोकॉल तोडून नरेंद्र मोदींचे स्वागत केले. मोदींसोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. ममता बनर्जी शुक्रवारी रात्री बांगलादेशात पोहोचल्या होत्या.

'भारतासोबत अत्यंत चांगले संबंध राहिलेल्या देशाचा दौरा करण्यासाठी जाताना मला मनापासून आनंद होत आहे. दोन्ही देशांचे संबंध अतिशय मजबूत आहेत', असे 'ट्वीट' रवाना होण्यापूर्वी मोदींनी केले आहे.
नरेंद्र मोदींचा आजचा कार्यक्रम
2.45 PM: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जीसोबत चर्चा
3.15 PM: लकाता-ढाका-अगरतळा, ढाका-गुवाहाटी-शिलांग बसला हिरवी झेंडी दाखवणार
03.10 PM: लॅंड बाउंड्री अॅग्रीमेंटनुसार जमिनीची अदला-बदली करारावर स्वाक्षरी
03.15 PM: पंतप्रधान कार्यालय 'शेर-ए-बांगला' नगरात शेख हसीना यांच्या सोबत चर्चा
6.25 PM: पीएमओसोबत प्रेस स्टेटमेंट
7.30 PM: परराष्ट्र सचिव एस जयशंकर द्वारा मीडिया ब्रीफिंग
8.30 PM: पंतप्रधान शेख हसीना द्वारा मोदींच्या सन्मानार्थ प्रीतीभोज

दरम्यान, पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह दोन्ही भारतीय नेत्यांची मोठमोठी कटआऊट्स राजधानीतील प्रमुख मार्गांवर लावण्यात आली आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना जाहीर झालेला बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यासाठीचा ‘ स्वातंत्र्य लढा सन्मान पुरस्कार’ मोदी या दौ-यात स्वीकारतील.

मोदी यांची बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या समवेत द्विक्षीय चर्चा होईल. बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष मोहंमद अब्दुल हामिद तसेच इतर प्रमुख नेत्यांशीदेखील त्यांची बैठक होणार आहे. मोदी यांच्या दौर्‍यात तिस्ता जल करारासंबंधी चर्चा होणार नसल्याचे अगोदरच स्पष्ट करण्यात आले आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी 31 मे रोजी सरकारची भूमिका
मांडली होती की, पश्चिम बंगाल सरकारची सहमती घेण्यात येईल. कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचे स्वराज यांनी सांगितले होते.

दाैर्‍याचा अजेंडा
> कोलकाता-ढाका-आगरतळा, ढाका -शिलाँग-गुवाहाटी बससेवा सुरू होणार.
> रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढणार. 1965 पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या रेल्वे रूळ दुरुस्त करणार.
> दोन्ही देश सागरी व्यापारासंबंधी करार करतील. भारतीय जहाज बांगलादेशातील बंदरावरून वाहतूक सुरू करतील. सध्या भारतीय जहाजांना सिंगापूरमधून जावे लागते.
> भारतीय कंपन्या बांगलादेशात बंदर बनवण्याची प्रक्रियेत सहभागी होतील.
> बांगलादेश पूर्वोत्तरला दक्षिण-पूर्व आशियाला जोडण्यास मदत करेल, असे भारताला वाटते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौर्‍याचा व्हिडिओ आणि फोटो...