आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज दुसरा पगारी दिवस, बँकांमध्ये नोटटंचाई, गर्दी आवरण्याची डोकेदुखी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : बहुतांश कंपन्या आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने दर महिन्याच्या ७ तारखेला कामगार- कर्मचाऱ्यांचे वेतन करतात त्यामुळे बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील पगाराच्या दिवशी बँकांत गर्दी वाढणार हे लक्षात घेऊन बँकांनी तयारी केली असली तरी त्यांच्यापुढे नोटटंचाईचे संकट आहे..
बँकांच्या अनेक शाखांत नोटटंचाईमुळे रिझर्व्ह बँकेची आठवड्याला २४ हजार रुपये काढण्याची परवानगी असतानाही बँका त्यापेक्षा कमी रक्कम देत आहेत. पुढचे पाच ते सात दिवस पगार आणि निवृत्तिवेतन काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी असेल. ग्राहकांकडून मोठी मागणी होत असल्यामुळे बँक शाखा पातळीवर रेशनिंग केले जात आहे, असे एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक रजनीश कुमार यांनी सांगितले.

‘कॅशलेस’साठी येणार राज्याचे महावाॅलेट अॅप
कॅशलेस व्यवहारांना विश्वसनीय पर्याय देण्यासाठी राज्य सरकारचे पेटीएमच्या धर्तीवर स्वत:चे महावॉलेट अॅप येणार आहे, अशी माहिती अर्थ विभागातील सूत्रांनी दिली. अँड्राॅइड मोबाईल हँडसेट, बँक खाते, डेबिट, क्रेडिट कार्ड नसलेल्या तसेच निरक्षर लोकांनाही वापरता येईल, असे विकसित केले जाईल.
बातम्या आणखी आहेत...