नवी दिल्ली- आजच्याच दिवशी बरोबर 23 वर्षापूर्वी देशाने माजी पंतप्रधान राजीव गांधींना गमावले होते. श्रीपेरूंबंदूर येथे झालेल्या स्फोटात राजीव यांच्या शरीराच्या लाह्या-लाह्या झाल्या होत्या. लिट्टेने केलेल्या हा भयाण कृत्याने भारताच्या तरूण व तडफदार नेत्याला हिसकावून नेले होते. या घटनेने देशाला हादरवून टाकले होते. कोणत्याही दहशतवादी संघटनेने त्याआधी अशी हारकत केली नव्हती. मात्र, या मानवी बॉम्बच्या स्फोटाने खळबळच माजवून दिली. चौकशीनंतर लिट्टेचा प्रमुख प्रभाकरण याच्यासह अनेक आरोपींवर कट रचल्याचा गुन्हा दाखल झाला. यात मुख्य कट रचणा-यात नलिनी, संथम, मुरूगन, पेरीवलिन यांना पकडून फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र, या आरोपींना अनेक वर्षे फाशी न दिल्याने त्यांची जन्मठेपेत शिक्षा परावर्तीत झाली आहे.
राजीव यांच्या हत्येनंतर देशात एसपीजी म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची स्थापना करण्यात आली. ज्यानुसार पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांच्या नातेवाईकांना सुरक्षा पुरविण्यात येते. आजही ही व्यवस्था लागू आहे.
राजीव गांधी यांची आठवण देश आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त काढत आहे. मात्र राजीव यांची हत्या कशी झाली त्याची आम्ही छायाचित्रे तुम्हाला दाखविणार आहोत. ही छायाचित्रे तुम्हाला विचलित करू शकतात पण ती सत्य व वास्तव मांडणारी आहे. तसेच या घटनेचे गंभीरता दर्शिवतात.
तारखीनुसार पाहा केव्हा काय-काय झाले....
21 मे 1991- तामिळनाडूतील श्रीपेरंबदूर येथे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची मानवी बॉम्बच्या सहाय्याने रात्री आठ ते नऊच्या दरम्यान हत्या झाली.
22 मे 1991- राजीव गांधी हत्याप्रकरणी गुन्हा दाखल, घटनेची चौकशी सीबीआयकडे दिली. याचबरोबर घटनास्थळावरील कॅमे-याच्या सहाय्याने पुरावे गोळा करण्यात आले. 24 मे 1991- सीबीआयने चौकशीसाठी एक एसआयटी स्थापन केली.
11 जून 1991- या घटनेप्रकरणी पहिली अटक, भाग्यनाथन आणि पद्मा यांना ताब्यात घेतले.
14 जून 1991 :- पहिले आरोपी म्हणून नलिनी मुरुगन आणि तिचा पति मुरुगन यांना अटक.
29 ऑगस्ट 1991 :- अखेरचा आरोपी रंगन याला अटक
20 मे 1992 :- एसआयटीने चार्जशीट दाखल केली.
24 नोव्हेंबर 1993 :- आरोप निश्चित करण्यात आले.
19 जानेवारी 1994 :- सुनावणीला सुरुवात, कॅमेरा ट्रायलला सुरुवात.
29 मे 1994 :- कोर्टाने लिट्टे प्रमुख प्रभाकरण, लिट्टेचा इंटेलिजेंस प्रमुख पुट्टू अम्मान आणि त्यांची महिला विंग अकिला हिला फरारी घोषित केले.
3 जून 1994 :- भारताने श्रीलंकाकडे लिट्टे प्रमुख प्रभाकरण आणि राजीव यांच्या हत्येत सहभागी असलेले आरोपींना भारताच्या ताब्यात देण्याची मागणी केली.
30 डिसेंबर 1996 :- हत्याकांडांची सुनावणी करणारे जज सिद्दीकी यांच्या जागेवर व्ही. नवीनथम यांची नियुक्ती करण्यात आली.
28 जानेवारी 1997 :- कोर्टाने सर्व 26 आरोपींना दोषी जाहीर केले. यात प्रभाकरण याचेही नाव होते.
21 जून 1997 :- पुराव्यांच्या आधारावर कारवाई सुरु झाली.
11 सप्टेंबर 2007 :- श्रीलंकेच्या संरक्षण वेबसाइटने लिट्टेचा दहशतवादी कुमारन पद्माथन (केपी) याला थायलंडमध्ये पकडल्याचे माहिती पुढे आली. भारताने व सीबीआयने त्याच्या प्रत्यर्पणाची मागणी केली.
12 सप्टेंबर 2007 :- थायलंड पोलिसांनी केपी कुमारन पद्मनाथनच्या अटकेची वृत्त नाकारले.
11 मे 1999 :- सुप्रीम कोर्टाच्या तीन न्यायाधिशाच्या खंडपीठाने राजीव यांच्या हत्येला वरील काही आरोपींना दोषी ठरवित स्थानिक व सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. यात नलिनी, संथम, मुरुगन, पेरीवलन यांना फाशीची शिक्षा सुनावतानाच या घटनेतील अन्य दोषी रोबर्ट पायस, जयकुमार, रविचंद्रन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणातील अन्य 19 आरोपींना आरोपातून मुक्त केले.
वर्ष 2000 :- या प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींनी राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली.
28 जून 2006 :- लिट्टेने प्रथमच राजीव यांची हत्या केल्याची कबुली दिली.
ऑगस्ट 2011 :- तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी 11 वर्षानंतर सर्व दोषींची दया याचिका फेटाळून लावली. दया याचिका दाखल करणा-यात मुरुगन, संथम, पेरीवलन होते.
30 ऑगस्ट 2011 :- मद्रास हायकोर्टाने या प्रकरणात फाशीची शिक्षा झालेले मुरुगन उर्फ श्रीहरन, संथम आणि पेरीवलन उर्फ अरिवू यांच्या फाशी देण्याला स्थगिती दिली.
2014- सुप्रीम कोर्टाने मुरुगन उर्फ श्रीहरन, संथम आणि पेरीवलन उर्फ अरिवू यांच्या फाशीला स्थगिती दिली व जन्मठेपेत शिक्षा परावर्तीत केली. या निर्णयानंतर दुस-याच दिवशी तमिळनाडु सरकारने तीन्ही आरोपींच्या सुटकेची तयारी केली. त्यावर केंद्र सरकारने आक्षेप घेतला व कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली. सुनावणीनंतर कोर्टाने त्या आदेशाला स्थगिती दिली व निर्णय आपल्याकडे सुरक्षित ठेवला.
पुढे पाहा, राजीव गांधी यांच्या हत्याशी संबंधित छायाचित्रे...