आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today The President Pranab Mukherjee Will Take Up The Modi Government\'s Agenda

राष्ट्रपतींचे अभिभाषण : सरकारचा अजेंडा सादर, महागाईपासून सुटकेला प्राधान्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी समोवारी संसदेच्या सेंट्रल ह़ॉलमध्ये संयुक्त सत्रात केलेल्या अभिभाषणात महागाईचा निपटारा करण्यास केंद्र सरकार प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रपतींनी यावेळी मोदी सरकारचा अजेंडा दोन्ही सभागृहातील सदस्यांसमोर मांडला. राष्ट्रपतींच्या भाषणानंतर त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे उपराष्‍ट्रपती हमीद अन्सारी यांनी वाचून दाखवले.

अभिभाषणानंतर दोन्ही सभागृहांचे सरचिटणीस अभिभाषणाच्या प्रती पटलावर ठेवतील. भाजपतर्फे मुख्तार अब्बास नक्वी राज्यसभेत तर लोकसभेत राजीव प्रताप रूडी हे चर्चेला सुरुवात करतील.

राष्‍ट्रपतींनी केलेल्या अभिभाषणातील प्रमुख मुद्दे

- कोळसा, खनिजे आणि टेलिकॉम स्पेक्ट्रम अशा नैसर्गिक साधनसंपत्तीच्या कंत्राट वाटपासाठी पारदर्शक आणि स्पष्ट नियम तयार केले जातील.

- दहशतवाद आणि धार्मिक भेदभाव किंवा वाद संपवण्यासाठी नवे धोरण आखणार.

- संरक्षण क्षेत्रात भारत जागतिक स्तरावर लवकरच ठसा उमटवेल. डिफेंस सेक्टरमध्ये कर्मचा-यांची कमतरचा दूर केली जाईल.

- सरकार लवकरच वॉर मेमोरियल तयार करेल.

- उत्पादन क्षेत्रात तेजी यावी यासाठी सिंगल विंडो सिस्टीम सुरू करणार.

- लहान भागांना जोडण्यासाठी लो कॉस्ट एअरपोर्ट विकसित करणार.

- हाय स्‍पीड रेल्वेच्या योजना राबवणार.

- रेल्वे क्षेत्राच्या अधिक विकासासाठी पावले उचलणार.
- करसंबंधी नियम अधिक चांगले व्हावे आणि गुंतवणुकीसाठी चांगले वातावरण तयार व्हावे, यासाठी प्रयत्न करणार.
- सरकार आणि सामान्य व्यक्तीमधील दुरावा कमी करण्यासाठी सोशल मिडियाचा वापर होणार.
- प्रमुख भागांमध्ये आगामी 5 वर्षांत वाय फाय झोन, नॅशनल ई गव्हर्नंस प्लॅन राबवणार.

- कश्‍मिरी पंडित परतावे यासाठी शक्य ती सर्व मदत करणार.

- ईशान्येकडील घुसखोरीच्या समस्येला प्राधान्य देऊन त्याचा निपटारा करणार.

- नवीन सरकार संसदेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यास कटीबद्ध आहे.

- महिलांविरोधात होणा-या गुन्ह्यांप्रती झीरो टॉलरंस धोरण.

- बेटी बचाओ आणि बेटी पढाओ सारखे उपक्रम सुरू करणार.

- मदरशांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने काम करणार.

- प्रत्येक राज्यात नवे आयआयटी आणि आयआयएम सुरू करणार.
- स्‍वच्‍छ भारत मिशनची सुरुवात करणार.
- खेळांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार.
- जलसंपदेची सुरक्षा करण्यास प्राधान्य.
- गरीबी कमी करण्यासाठी नव्हे तर संपवण्याचा उद्देश.
- ग्रामीण भागातील जीवनस्तर सुधारण्यासाठी, पंचायत राजला बळ दिले जाणार.

- अवैध साठेखोरी आणि काळाबाजार रोखण्यासाठी पावले उचलली जाणार.
- गरीबी संपुष्टात आणणे हे सर्वात मोठे आव्हान.
- 'मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्‍सिमम गव्हर्नंस' च्या मंत्रावर काम करणार.
पुढील स्लाईड्सवर वाचा राष्ट्रपतींचे पूर्ण भाषण आणि भाषणाचा व्हिडिओ पाहा शेवटच्या स्लाईडवर