आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमन मॅनने म्‍हटले, आता भारतात अशी दुसरी व्‍यक्‍ती होणे नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्‍ट्रीय दुखवट्यामुळे अर्ध्‍यावर आणलेला ध्‍वज. - Divya Marathi
राष्‍ट्रीय दुखवट्यामुळे अर्ध्‍यावर आणलेला ध्‍वज.
'दिव्‍य मराठी डॉट कॉम'चे शरद गुप्‍ता सांगत आहेत दिल्‍ली विमानतळ ते राजाजी मार्गापर्यंतचा कलाम यांच्‍या अखेरच्‍या प्रवास
नवी दिल्ली – मंगळवार. वेळी सकाळी 11 वाजताच्‍या आसपासची. मी राजाजी मार्गावर निघालो तेव्‍हा एका वृक्षाखाली 4-5 मित्रांचा ग्रुप उभा होता. सगळ्यांचे वय 20 ते 22च्‍या दरम्‍यान. एका हाताने ओलावालेल्‍या पापण्‍या पुसत आणि दुस-या हातात बुक्‍के पकडून ते उभे होते. जणू कुणीची तरी वाट पाहत आहेत. जेव्‍हा मी परत आलो तेव्‍हाही हा ग्रुप येथेच उभा होता. फरक एवढाच की, त्‍यांच्‍या आसपास अजून काही ग्रुप आले होते. सगळे युवाच होते.
युवकांमध्‍ये कलामांची मोठी क्रेज
या युवकांना फक्‍त एवढेच माहिती होते की, राजाजी मार्गावर कलाम रहत होते. त्‍यांना माहिती नव्‍हते की त्‍यांचे पार्थिव किती वाजता विमानतळावर आणि किती वाजता राजाजी मार्गावर पोहोचणार आहे ते. त्‍यामुळेच ते सकाळी आले होते. यातील बहुतांश जण असे होते की, ज्‍यांनी कमालांना केवळ टीव्‍हीवरच किंवा प्रत्‍यक्षात व्‍याख्‍यान ऐकले होते. काही जण असेही होते की जे कलामांना भेटले होते. त्‍यांच्‍यासोबत बोललेही होते. कलमांच्‍या निधनाने सगळेच दुखी होते.
घराच्‍या बाहेर मोठी गर्दी
साडे बार वाजता कलाम यांचे पार्थिव दिल्लीत पोहोचणार होते. त्‍या ठिकाणाहून कलाम यांचे घर 15 किलोमीटर अंतरावर आहे. एक वाजतापासून गर्दी जमायला सुरुवात झाली. पोलिस दलाने कडक सुरक्षा व्‍यवस्‍था तैनात केली होती. पूर्ण रस्‍त्‍यावर बॅरिकेडिंग केले गेले होते. केवळ पत्रकार आणि अधिका-यांना आत जाऊ दिले जात होते. पण, त्‍यांचेही ओळखपत्र तपासले जात होते. या ठिकाणी जवळपास 50 ओबी व्‍हॅन आणि 500 पत्रकार उपस्थित होते. काही पत्रकार कश्मीर हाउसच्‍या बाउंड्रीवरही चढले होते. काही तर झाडावरही चढले होते.
ऑटोवाल्‍यांनीही म्‍हटले, भारताला आता अशी दुसरी व्‍यक्‍ती मिळणार नाही
कलाम यांच्‍या घराबाहेर गर्दी वाढतच होती. दिल्‍लीत एकच प्रश्‍न जास्‍त विचारला जात होता की राजाजी मार्ग कुठे आहे ते. ऑटोवाल्‍यांनाही तिकडेच घेऊन चला, असे म्‍हटले जात होते. त्‍यावर आता ‘भारतात अशी दुसरी व्‍यक्‍ती होणे शक्‍य नाही’ अशीच प्रतिक्रिया ऑटोवाले देत होते.
संबंधित फोटो पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...