आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा1) राजस्थान : बस्सीमध्ये चक्क सॉफ्टवेअरद्वारे होत आहे शेती
पिकांच्या पाणी-खतावर कॉम्प्युटरच्या नियंत्रणाने आणली मोठी बरकत!
गोवर्धन चौधरी
जयपूर- आता शेती करणेही हायटेक होत आहे. जयपूर जिल्ह्यातील बस्सीजवळ कृषी खात्याच्या डिंडोल या शेतमळ्यात इस्रायली तंत्रज्ञान आधारित कॉम्प्युटर नियंत्रित सिंचनाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. इस्रायली तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे पाण्याच्या थेंबाथेंबाचा वापर होत आहे. रोपट्यांना किती पाणी द्यायचे, किती खत टाकायचे, किती वेळेपर्यंत पंप चालू ठेवायचा- आदी सर्व कामे कॉम्प्युटरद्वारे नियंत्रित केली जात आहेत. सिंचनाचे हे सॉफ्टवेअर सहज उपलब्ध असून कंपन्या विक्रीपश्चात सेवाही पुरवत आहेत. डिंडोलच्या ऑलिव्ह फार्मवर मल्चिंग तंत्रज्ञानाद्वारे शेती होत आहे. यात जमिनीवर प्लास्टिकचे आच्छादन अंथरले जाते, ज्यामुळे बाष्पीभवन होत नाही. तणही उगवत नाही अन् कमी पाण्यात रोपटे चांगले जोम धरते.
2) गुजरात : राजसमढियालामध्ये इस्रो देत आहे पाणी शोधण्याचे तंत्रज्ञान
रिमोट सेन्सिंगद्वारे पाणी शोधले, आता तंत्रज्ञानासाठी देशभरातून ओघ
राजकोट. राजसमढियाला-सौराष्ट्रमधील राजकोट जिल्ह्यातील एक गाव. जिल्ह्याची कचेरी 20 किलोमीटर दूर असलेल्या या गावात इस्रोच्या सहकार्यातून पाण्याची साठवणूक केली जाते. 1978 ते 2011 पर्यंत उपग्रहाच्या माध्यमातून नकाशा तयार करण्यात आला. यानंतर वैज्ञानिक पद्धतीने पाणी असलेल्या ठिकाणांचे मार्किंग करण्यात आले. आतापर्यंत 45 लघु बंधारे आणि आठ लहान-मोठे तलाव उभारण्यात आले आहेत. गावातील हरदेवसिंग जडेजा यांच्या नेतृत्वाखाली हे काम होत आहे. जलसंकटाचा शाप भोगणाºया या गावाचा आता चेहरामोहराच बदलून गेला आहे. तलावांना बारोमाही पाणी राहते. बंधारेही वाहते असतात. हरदेव सिंग म्हणाले, उपग्रहाद्वारे पाणी शोधण्याचा प्रयोग फक्त आमच्याच गावात झालेला आहे.
....................
3) पंजाब : नद्या स्वच्छ होण्याचा मार्ग खुला झाला
जलपर्णीतून मिळवला रोजगार
प्रवीण पर्व
जालंधर- जलपर्णी वनस्पती नद्या-तलावांसाठी मोठी समस्या ठरते. आतापर्यंत या वनस्पतीचा कोणताही वापर हो नव्हता. यामुळे नद्यांमध्ये वाढणारी जलपर्णी तशीच राहत होती. मात्र जालंधरनजीक लोहियां व मक्खू येथील नागरिकांनी जलपर्णीपासून पेनस्टँड, फाइल कव्हर आणि डायनिंग टेबलच्या मॅटची निर्मिती सुरू केली आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी व्हावा म्हणून या जलपर्णीपासूनच पिशव्याही तयार केल्या जात आहेत.
झुरियांतील हरदेवसिंह (40) जलपर्णीपासून मॅट बनवण्यात मग्न होते. एका हातात चाकू आणि दुसºया हातात डिंकाची ट्यूब. ते म्हणाले, शेतमालकांनी मशीन घेतल्यामुळे आता आम्हाला शेतीत वर्षभर काम मिळत नाही. मी जलपर्णीपासून चटई तयार करतो. या चटया जालंधरला नेऊन विकेन. हरदेवसिंहच्या शब्दांत नवी उमेद होती. वनाधिकारी सांगतात, पंजाबमधील तलावांचे पाणी खराब होण्याचे मोठे कारण या जलपर्णी आहेत. ती पाण्याचा प्रवाह अडवते, यामुळे वातावरणातील ऑक्सीजन पाण्यात मिसळू शकत नाही. खात्याच्या कर्मचाºयांना केरळात जलपर्णीपासून वस्तूनिर्मितीचे प्रशिक्षण दिले. या वनस्पतीचा वापर व्हावा, हाच यामागचा उद्देश. यामुळे नद्या, तलाव स्वच्छ होतील, गरजू लोकांना रोजगार मिळेल आणि प्लास्टिकचा वापरही कमी होईल.
.....................
4) हरियाणा : डोंगर अडला, त्याचीच घेतली मदत
नगलीत ग्रामस्थ झाले भगीरथ
मनोज ठाकूर
यमुनानगर - चार वर्षांपूर्वी नगली गावातील लोक घोटभर पाण्याला महाग होते. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना 10-10 किलोमीटर पायपीट करावी लागे. गाव तीन बाजूंनी डोंगरांने वेढलेले असणे, हे याचे मुख्य कारण होते. दरवर्षी पावसाळ्यात पूर येत असे. पावसाळा संपताच पुन्हा दुष्काळ पडे. शेवटी या जलसंकटाचे कारणच त्यावरील उपाय बनले. सरपंच हाजी अमीर हसन म्हणाले, डोंगरावरून वाहणारे पाणी अडवण्यासाठी डोंगराच्या बाजूने एक भिंत बांधण्याचे ठरले. निर्णय झाला, सगळे कामाला लागले. कृषी विभागाने तांत्रिक मदत पुरवली, गावकºयांनी श्रमदान केले आणि पाहता पाहता डोंगराच्या बाजूने भिंत उभी राहिली. आता हे जमा झालेले पाणी गाव आणि शेतीपर्यंत नेण्याचा प्रश्न होता, त्यासाठी जलवाहिनी टाकली. पाणी उंचावर जमा होत असल्याने, गावापर्यंत चांगल्या दाबाने पाण्याचा पुरवठा होत आहे. अशाप्रकारे गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले. गावातील अशरफ, हाजी सलामुद्दीन आणि हाजी गुलामदीन यांनी हे पाणी सिंचनासाठीही वापरले जात असल्याचे सांगितले. हरियाणात फक्त 7 जिल्हे टंचाईग्रस्त आहेत. यामध्ये महेंद्रगड, नारनौल, पलवल, हिसार, गुडगाव, भिवानी, जिंद का नरवालाचा समावेश आहे. येथे भूजल पातळी 10 ते 15 मीटरच्या खाली गेली आहे.
५) ‘सहारा’त शेते डोलतात- कतार येथे सहारा फॉरेस्ट प्रोजेक्ट सुरू आहे. येथे सौरऊर्जा आणि समुद्राच्या पाण्याचा वापर करून गव्हाची शेती केली जात आहे. ही पद्धत जरा खर्चीक आहे, पण त्याचे परिणाम विस्मयकारक आहेत. सौदी अरेबियातही आता वाळवंटात शेती केली जात आहे. शेतीच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी येथे हरितगृहे उभारली जात आहेत.
वॉटर फूट प्रिंट कमी करा, आपोआपाच पाणी होईल बचत - आजच्या तुलनेत 2050 पर्यंत अन्नधान्याच्या उत्पादनासाठी पाण्याची गरज 20 टक्क्यांनी वाढेल. सुरक्षित भविष्यासाठी आजपासूनच वॉटर फूट प्रिंटमध्ये कपात करण्यास प्रारंभ करा.
वॉटर फूट प्रिंट म्हणजे काय?- पाण्याच्या सर्वसामान्य वापराऐवजी, वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाºया पाण्याचा हा ताळेबंद असतो. थोडक्यात जीन्स पँट असो किंवा तांदूळ, दोन्हीच्या उत्पादनासाठी जेवढे पाणी वापरले गेले, ते या वस्तूंचे वॉटर फूट प्रिंट आहे. मांसाहाराच्या तुलनेत शाकाहाराचे वॉटर फू ट प्रिंट कमी असते. आपण आपली जीवनशैली आणि खानपानाच्या सवयींच्या आधारे आपले वॉटर फूट प्रिंट माहिती करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हास फक्त या लिंकवर क्लिक करावे लागेल. www.waterfootprint.org/?page=cal waterfootprintcalculator_indv
विकसित देशात सर्वाधिक नासाडी - सर्व लोकांनी जर 1/3 अमेरिकींंप्रमाणे जगण्यास सुरुवात केली तर आपल्याला पृथ्वीसारखे अजून 3.5 ग्रह लागतील.
अमेरिकेचे वॉटर फूट प्रिंट आहे सर्वात जास्त (६९ क्यूबिक मीटर वार्षिक)
कारण काय- मांसाहारी लोकांचे प्रमाण जास्त असलेल्या अमेरिकेत प्रतिकिलो बोनलेस मटनाचे वॉटर फूट प्रिंट 16 हजार लि. आहे. 1 हॅमबर्गरचे प्रिंट 2400 ली. येथे एका व्यक्तीच्या एक वेळ जेवणावर 5 क्यूबिक मीटर पाणी खर्च होते.
आमचा दरडोई वापर जगाच्या सरासरीपेक्षा कमी (980 क्यूबिक मीटर वार्षिक)
कारण काय- देशातील 30 % जनता शाकाहारी असल्याने दरडोई वॉटर फूट प्रिंट कमी. शाकाहारी व्यक्तीच्या एका वेळच्या अन्नासाठी 2.6 क्यूबिक मी. पाणी लागते. अमेरिकेच्या तुलनेत निम्मे. आपला वापर 1243 या वैश्विक सरासरीपेक्षाही कमी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.