आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्यानंतर टोमॅटो भडकला दिल्लीत 80 रुपये किलो!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कांद्याने नागरिकांना रडवले असतानाच टमाट्याचे दरही कडाडले आहेत. राजधानीत महाराष्ट्र, मध्य प्रदेशातून आलेल्या टमाटे 80 रुपये किलोने विकले जात आहेत.

दिल्लीत मदर डेअरीचे 400 आऊटलेट्स आहेत. त्यांच्याकडून टमाटे 64 रुपये किलोने दिले जात असून किरकोळ विक्रेते ते 70 ते 80 रुपये एवढय़ा चढय़ा दराने विकू लागले आहेत. गेल्या आठवड्यात टमाटे 40 रुपये किलो होते. हिमाचल प्रदेशातून राजधानीत येणार्‍या टमाट्यांची आवक जवळपास थांबली आहे. थंडीमुळे टमाट्यांची आवक बंद झाली आहे. त्यामुळे दर वाढले, असे दिल्लीतील ठोक बाजारपेठेतील व्यापार्‍यांनी सांगितले. दिवाळीपूर्वी दिल्लीत 35 ते 40 ट्रक टमाटे येत होते. परंतु आता मात्र त्यात 15-20 ट्रकवर घसरण झाली आहे. दुसरीकडे कांद्याचे दर गेल्या महिन्याच्या तुलनेत नियंत्रणात आले आहेत. कांदा प्रतिकिलो 100 रुपयांहून 60 रुपयांवर आला आहे.