आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्या देशभरात ‘नीट’ परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी ड्रेसकोड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नवी दिल्ली  - देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीबीएसईची “नीट’ ही प्रवेशपूर्व परीक्षा ७ मे रोजी होणार आहे. यासाठी सीबीएसईने ड्रेसकोडसह अनेक दिशानिर्देश जारी केले असून त्यांचे पालन न केल्यास परीक्षेपासून वंचित राहावे लागू शकते. कॉपीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठीही सीबीएसईने अनेक नियम बनवले आहेत. यात विद्यार्थ्यांनी काय घालावे, सोबत काय आणावे आणि काय नाही, याविषयी सल्ला दिला आहे. देशभरातील १०३ केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून यंदा इंग्रजीसह अन्य नऊ प्रादेशिक भाषांमध्येही ही परीक्षा देता येणार आहे. यामध्ये हिंदी, इंग्रजी, आसामी, बांगला, गुजराती, मराठी, कन्नड, ओडिया, तमिळ आणि तेलुगूचाही समावेश आहे.  
 
कपड्यांबाबत विशेष सूचना  : नीट परीक्षेसाठी सीबीएसईने विद्यार्थ्यांनी परिधान करावयाच्या कपड्यांबाबत कठोर नियम बनवले आहेत. विद्यार्थिनी परीक्षेत साडी घालून तसेच मेंदी लावून येऊ शकणार नाहीत. विद्यार्थ्यांना हवाई चप्पल किंवा सँडल, हाफ बाह्यांचे टी-शर्ट किंवा शर्ट, ट्राऊझर, लेगिंग्स, लोवर, प्लाझो, हाफ बाह्याची कुर्ती, टॉप घालता येईल. मोठ्या बटणाचे किंवा फुलांचे चित्र असलेल्या कपड्यांवर बंदी आहे.  
 
मंगळसूत्र घालण्यावर बंदी नाही  : या परीक्षेसाठी विवाहित महिलांना मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे. मात्र, बुरखा किंवा साडी परिधान करता येणार नाही. ताईत, ब्रेसलेट, कृपाणसारख्या वस्तू जवळ बाळगता येणार नाहीत. शिवाय पर्स, क्रेडिट-डेबिट कार्ड, लॉकेट, बूट, पूर्ण बाह्यांचे शर्ट, घड्याळ, उन्हापासून बचाव करणारे चष्मे, हेअरक्लिप, रबरबँड, बेल्ट, बांगड्यासुद्धा घालता येणार नाही.  
 
नीटसाठी खास पेन  
नीटसाठी सीबीएसईने खास पेन तयार केला असून परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र दाखवल्यानंतर हा पेन विद्यार्थ्याला दिला जाईल. हा पेन फक्त नीट परीक्षेसाठीच तयार करण्यात आला असल्याने बाजारात कुठेही मिळणार नाही.  
 
यंदा ४१ टक्के अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी  
यंदा नीट परीक्षेसाठी ११, ३५, १०४ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या ४१.४२ टक्क्यांनी जास्त आहे. मागच्या वेळी ८, ०२, ५९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज 
केला होता.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...